शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

दर पाच मिनिटांनी एकाला कोरोनाचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:12 IST

गजानन मोहोड अमरावती : जिल्ह्यात जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना उद्रेकात दर ४ मिनिटे ५० सेंकदात एक कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली ...

गजानन मोहोड

अमरावती : जिल्ह्यात जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना उद्रेकात दर ४ मिनिटे ५० सेंकदात एक कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली आहे. याशिवाय दर ८ तास ३३ मिनिटांत एका कोरोनाग्रस्तांचा बळी गेल्याची आकडेवारी धक्कादायक आहे. या उद्रेकात ४० टक्क्यांवर गेलेली चाचण्यांमधील पॉझिटिव्हिटी आता आठ टक्क्यांवर आल्याचा दिलासादेखील आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यांपासून आतापर्यंत २५,२७० कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. या ७९ दिवसांत दरदिवशी ३१९.८७ पॉझिटिव्ह निष्पन्न झालेले आहे. म्हणजेेच दरदिवशी ४ मिनिटे ५० सेंकदात एका कोरोनाग्रस्ताची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. याशिवाय याच कालावधीत २२७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. या कालावधीत दर ८ तास ३३ मिनिटांत एका पॉझिटिव्हचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद ४ एप्रिलला झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच ३५० दिवसांत ४४,९३८ नागरिकांना कोरोनाचा डंख झालेला आहे. म्हणजेच एका दिवसांत १२८.३९ कोरोनाग्रस्ताची नोंद या काळात झालेली आहे. दर ११.१८ मिनिटांनी एका व्यक्तीला कोरोना संसर्ग झालेला आहे व याच कालावधीत ६२४ व्यक्तींचा मृत्यू झाल्याने दरदिवशी तीन नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. दर ८ तास ३३ सेंकदात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा धक्कादायक वास्तव आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारा कोरोना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. वाढत्या बेडची संख्या. प्रत्येक तालुक्यात कोरोना सेंटर सोबत नमुने घेण्याचे केंद्रदेखील सुरू करण्यात आलेले आहे. याशिवाय पथकांद्वारा सातत्याने दंडात्मक कारवायादेखील सुरू आहे. याचाच परिपाक म्हणून या चार दिवसांत कोरोना संसर्गाला ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासाजनक बाब आहे.

बॉक्स

दर ५.४२ मिनिटाला एका कोरोनाग्रस्ताला डिस्चार्ज

जिल्ह्यात १९ मार्चपर्यंत ३९,५७३ कोरोनाग्रस्तांना संक्रमणमुक्त करण्यात आलेले आहे. हा रिकव्हरी रेट ८८.६८ टक्के आहे. जानेवारी महिन्यापासून १९ मार्चपर्यंत २०,९५७ व्यक्ती संक्रमणमुक्त झालेले आहेत. म्हणजेच दिवसाला २६५,२७ नागरिक कोरोनामुक्त झालेले आहे. दर ५.७१ मिनिटाला एक नागरिक कोरोनामुक्त होत असल्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

बॉक्स

या आठवड्यात कोरोना संसर्गाला ओहोटी

जिल्ह्यात जानेेवारी २०२१ पासून कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा स्फोट झाला. या महिन्यात जवळपास १५ हजार रुग्णांची नोंद झाली. ९५० पर्यंत उच्चांकी कोरोनाग्रस्तांची नोंददेखील याच कालावधीत झालेली आहे. आता ३०० ते ४०० दरम्यान अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत व चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीदेखील ८ टक्क्यांपर्यंत आली असल्याने कोरोना संसर्ग आता माघारल्याचे चित्र आहे.

बॉक्स

नव्या स्ट्रेनविषयी चर्चा, दुजोरा नाही

कोरोनाचे जनुकीय रचनेत बदल झालेला असून जिल्ह्यात कोरोनाचा नवा ‘स्ट्रेन’ आला व याद्वारे संक्रमणात वाढ झाल्याचे आयएमएचे पदाधिकारी सांगत आहे. याविषयी जिल्हा व आरोग्य प्रशासन बोलावयास तयार नाही. जिल्ह्यातून चार प्रकारातील १०० नमुने जिनोम स्टडीकरिता पुणे एनआयव्हीला पाठविण्यात आले होते. याविषयी आयसीएमआरचा अहवाल अप्राप्त असल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

बॉक्स

आतापर्यंत दिवसाला सरासरी १२८ पॉझिटिव्हची नोंद

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याचे ४ एप्रिलपासून आतापर्यंत ४४,९३८ रुग्णांची नोंद झालेली आहे. म्हणजेच एका दिवसात १२८ व ११ मिनिटे २४ सेंकदाला एका कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली आहे. याशिवाय याच कालावधीत ६२४ कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. म्हणजेच दरदिवशी दोन व दर १२ तासांत एका कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे धक्कादायक चित्र आहे.

पाईंटर

* १ जानेवारीची स्थिती

एकूण कोरोनाग्रस्त : १९,६६८

संक्रमितांचे मृत्यू : ३९६

संक्रमणमुक्त व्यक्ती :१८,८९५

* २० मार्च रोजीची जिल्हास्थिती

एकूण कोरोनाग्रस्त : ४४,९३८

संक्रमितांचे मृत्यू : ६२४

संक्रमणमुक्त व्यक्ती : ३९,८५२