शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप
2
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
3
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
4
दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत; आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती 
5
बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
6
२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही
7
‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार
8
जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला
9
मातोश्रीच्या ‘लाचार श्री’ना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा; कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी 
10
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
11
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
12
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
13
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
14
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
15
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
16
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
17
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
18
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
19
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
20
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...

कंत्राटदाराकडून नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:10 PM

पे-अँड पार्कच्या ठिकाणी स्वच्छता नसणे, कामगारांना ड्रेसकोड, ओळख पत्र नसणे व वाहनांचा किंवा नैसर्गिक आपत्तीचा जनरल इन्शुरन्स व कामगारांचा विमा नसणे आदी सर्व करारनाम्यातील अटींची पूर्तता झालेली नाही. वर्क ग्रुप सुशिक्षित बेरोजगार संस्थेने नियम धाब्यावर बसवून वसुली करण्यात येत असताना याकडे महापलिका आयुक्त हेमंत पवार यांचे दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्देपे-अँड पार्क : आयुक्तांचे दुर्लक्ष, जनरल विमा काढला नाही

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पे-अँड पार्कच्या ठिकाणी स्वच्छता नसणे, कामगारांना ड्रेसकोड, ओळख पत्र नसणे व वाहनांचा किंवा नैसर्गिक आपत्तीचा जनरल इन्शुरन्स व कामगारांचा विमा नसणे आदी सर्व करारनाम्यातील अटींची पूर्तता झालेली नाही. वर्क ग्रुप सुशिक्षित बेरोजगार संस्थेने नियम धाब्यावर बसवून वसुली करण्यात येत असताना याकडे महापलिका आयुक्त हेमंत पवार यांचे दुर्लक्ष आहे.शहरात पे-अँड पार्कसाठी कंत्राटदाराच्यावतीने वसुली करण्यात येत आहे. दोन हजार रूपये प्रतिदिवस १२ तास वसुलीचे महापालिकेला कंत्राटदार देत असून स्वत: २० ते २५ हजार रुपये कमावत आहेत. महापालिकेला उत्पन्नवाढीसाठी हा प्रयोग करायाचाच होता, तर ३७ गाड्यांवर अंदाजे २० ते २५ हजार रूपये प्रतिदिवशी पैसे घ्यायला हवे होते. मात्र, निविदेत दर अल्प दाखवून हा कंत्राट दिला आहे. या ठिकाणी नागरिकांचे रोज पे-अँड पार्कची वसुली करणाऱ्या कामगारांसोबत रोज वाद होत असताना याकडे बाजार परवाना विभागाचे कायम दुर्लक्ष होत असून पथक पाठवून यासंदर्भात तपासणी करण्यात यावी व लोकांचे अभिप्राय घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.