‘बच्चू नव्हे बिच्छू !’ सुपारी देऊन हत्या घडवण्याचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा खळबळजनक आरोप

By प्रदीप भाकरे | Updated: April 4, 2026 19:16 IST2026-04-04T19:08:17+5:302026-04-04T19:16:28+5:30

Amravati : माजी आमदार बच्चू कडू यांनी आपल्या आमदारकीचा दबाव वापरून आजवर किती प्रकरणे दाबली आणि कोणा-कोणाचा जीव घेतला, याचा गंभीर तपास करण्याची मागणी अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी केली.

Conspiracy to commit murder by giving money? Sensational allegation by MLA Praveen Tayde | ‘बच्चू नव्हे बिच्छू !’ सुपारी देऊन हत्या घडवण्याचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा खळबळजनक आरोप

Conspiracy to commit murder by giving money? Sensational allegation by MLA Praveen Tayde

अमरावती : माजी आमदार बच्चू कडू यांनी आपल्या आमदारकीचा दबाव वापरून आजवर किती प्रकरणे दाबली आणि कोणा-कोणाचा जीव घेतला, याचा गंभीर तपास करण्याची मागणी अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी केली. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा आणि गोरगरिबांचा कैवारी असल्याचा जो मुखवटा घातला होता, तो आता गळून पडला असून, सुपारी देऊन शांत डोक्याने हत्या घडवून आणणारा गुंड हीच त्यांची खरी ओळख आहे, अशी घणाघाती टीका तायडे यांनी केली. कडू हे ‘बच्चू’ नसून ‘बिच्छू’ असल्याचा प्रहारही त्यांनी यावेळी केला.  

शुक्रवारी सकाळी आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांच्या तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी बच्चू कडू, गोलू माहुरे आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला. एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामध्ये अभिजित तायडे यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचे त्यातून स्पष्ट होत असल्याचे आ. तायडे म्हणाले. शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रवीण तायडे यांनी कडू यांच्यावर टीकास्त्र सोडले. पत्र परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, नितीन धांडे, राज्य प्रवक्ते शिवराय कुलकर्णी उपस्थित होते. खासदार डॉ. अनिल बोंडे व आ. राजेश वानखडे यांनीदेखील पत्रपरिषदेला हजेरी लावली.

Web Title : आरोप: बच्चू कडू पर हत्या की साजिश का आरोप, विधायक तायडे का दावा।

Web Summary : विधायक प्रवीण तायडे ने बच्चू कडू पर प्रभाव का उपयोग करके हत्या की साजिश रचने का आरोप लगाया। एक ऑडियो क्लिप के आधार पर पुलिस में शिकायत दर्ज की गई, जिसमें तायडे के भाई के खिलाफ साजिश का खुलासा हुआ। तायडे ने कडू को 'बिच्छू' बताया, हितैषी नहीं।

Web Title : Accusations fly: Bachchu Kadu allegedly plotted murder, claims MLA Tayade.

Web Summary : MLA Pravin Tayade accuses Bachchu Kadu of murder plot using his influence. A police complaint was filed based on an audio clip revealing a conspiracy against Tayade's brother. Tayade calls Kadu a 'scorpion' not a benefactor.