शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला दिलासा, पाॅझिटिव्ह अन् पॉझिटिव्हिटीचा नीचांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 05:01 IST

 जिल्ह्यात ४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली व त्यानंतर सातत्याने संसर्ग वाढला. सद्यस्थितीत ९६,५०२ संक्रमित, १,५६१ संक्रमितांचा मृत्यू व ९४,८५६ संक्रमणमुक्त अशी जिल्ह्याची  स्थिती आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. किंबहुना डेल्टा व्हायरसमुळे राज्यात दुसऱ्या लाटेची सुरुवातच अमरावती जिल्ह्यापासून झाली. जिल्ह्यात ७० हजारांवर संक्रमित व एक हजारांवर मृत्यूची नोंद या काळात झाली.

ठळक मुद्देकोरोनाकाळातील सर्वांत कमी तीन रुग्ण गुरुवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या १५ महिन्यात पहिल्यांदा सर्वांत कमी तीन संक्रमितांची नोंद गुरुवारी झाली. २,३०६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ०.१३ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाली आहे. याशिवाय या ३० दिवसांत २४ दिवस संक्रमितांचा मृत्यू निरंक असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला.
 जिल्ह्यात ४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली व त्यानंतर सातत्याने संसर्ग वाढला. सद्यस्थितीत ९६,५०२ संक्रमित, १,५६१ संक्रमितांचा मृत्यू व ९४,८५६ संक्रमणमुक्त अशी जिल्ह्याची  स्थिती आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. किंबहुना डेल्टा व्हायरसमुळे राज्यात दुसऱ्या लाटेची सुरुवातच अमरावती जिल्ह्यापासून झाली. जिल्ह्यात ७० हजारांवर संक्रमित व एक हजारांवर मृत्यूची नोंद या काळात झाली. मे अखेरपासून संसर्ग कमी व्हायला लागलेला आहे.
 जुलै महिन्यात रोज २० च्या आत रुग्णसंख्येची नोंद होत आहे व या महिन्यात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदेखील २४ दिवस निरंक राहिला. त्यामुळे जिल्ह्याला निर्बंधापासून सूट देण्यात आलेली आहे. आता जिल्ह्याची दुसऱ्या वर्गवारीत नोंद झाल्यामुळे उर्वरित निर्बंधदेखील एक-दोन दिवसांत शिथिल केले जाणार असल्याची माहिती आहे.

शुक्रवारी सात संक्रमितांची नोंद
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार शुक्रवारी जिल्ह्यात सात नव्या पॉझिटिव्हची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ९६,५०२ झालेली आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने आठ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ९४,८५६ नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला. ही टक्केवारी ९८.२९ आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या