स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काँग्रेसचे मंथन

By Admin | Updated: October 10, 2016 00:18 IST2016-10-10T00:18:29+5:302016-10-10T00:18:29+5:30

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले आहे.

Congress's brainstorming on Local Body Elections | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काँग्रेसचे मंथन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काँग्रेसचे मंथन

जिल्हा काँग्रेसची बैठक : प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच उमेदवारीची संधी
अमरावती : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले आहे. त्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी जिल्हा ग्रामीण काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षनिरीक्षक आणि जिल्हाध्यक्षांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. दरम्यान पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांचाच उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे मत जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी बैठकीत स्पष्ट केले.
जिल्ह्यातील १० नगरपालिका, ५९ जिल्हा परिषद गट आणि ९८ पंचायत समितीच्या गणासाठी येत्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे जिल्हा प्रभारी बंडू सावरबांधे, शेखर शेंडे, रत्नदीप दहीवले, संजय बोडखे आदींसह आ. यशोमती ठाकूर, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, माजी आ. केवलराम काळे, सुलभा खोडके उपस्थित होते. प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांचाच उमेदवारीकरिता विचार केला जाईल, असे बबलू देशमुख यांनी स्पष्ट केले. सध्या सरकार विरोधात वातावरण असून कार्यकर्त्यांनी त्याचा लाभ घेत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचे आवाहन पक्षनिरीक्षक बंडू सावरबांधे यांनी केले. बैठकीला महिला जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, यशवंत शेरेकर, प्रल्हाद ठाकरे, सतीश हाडोळे, गिरीश कराळे, महेंद्रसिंग गैलवार, बाबासाहेब भोकरे, मोहन पाटील, संजय लायदे, मोहन सिंगवी, सुधाकर भारसाकळे, हरेराम मालवीय, बिंदू मंगरोळे, कांचनमाला गावंडे, उषा उताणे, मनोज जयस्वाल, विलास पवार, भागवंत खांडे, संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, बच्चू बोबडे, प्रवीण सवई व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Congress's brainstorming on Local Body Elections