शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य देखरेख समितीच्या सभेत तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: March 26, 2016 00:04 IST

अपेक्षा होमिओ सोसायटीअंतर्गत स्थानिक आरोग्य देखरेख अभियानाच्यावतीने शुक्रवारी जनसंवाद सभेचे आयोेजन ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले होते.

नाराजी : वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती चांदूररेल्वे : अपेक्षा होमिओ सोसायटीअंतर्गत स्थानिक आरोग्य देखरेख अभियानाच्यावतीने शुक्रवारी जनसंवाद सभेचे आयोेजन ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले होते. या सभेत शेकडो महिला आपापल्या गावांतील तक्रारी घेऊन उपस्थित होत्या. मात्र, सभेला तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी व तालुका आरोग्य विभागाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने उपस्थितांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. या सभेत संस्थेचे संचालक मधुकर गुंबळे, सभापती किशोर झाडे, सदस्य सतीश देशमुख, ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक मरसकोल्हे, प्रवर्जा महाजन, प्रभाकर भगोले, युसुफ खाँ पठाण, अभिजित तिवारी, काळे, मनू वरठी, उपसरपंच मीना निहाटकर, सदस्य भीमराव करवाडे आदींची उपस्थिती होती. ग्रामीण भागातील कुपोषित बालके, गरोदर महिलांचे संगोपन, अंगणवाडी पोषण आहाराबद्दल ग्रामीण भागाचे वास्तव आणि कर्मचाऱ्यांची स्थिती याबाबत कागदोपत्री माहिती घेऊन वरिष्ठांकडे पाठविण्याचा या बैठकीचा शिरस्ता आहे. महिलांनी या बैठकीत अनेक तक्रारी आणल्या होत्या. वाई बागापूर येथील मीरा उके यांनी तक्रार विशद करताना येथील गरोदर महिलांची तपासणी करून लसीकरण होत नाही, दोन महिन्यांपासून कर्मचारी फिरकले नाहीत, असे सांगितले तर रेखा धावडे यांनी नेत्रशल्याबाबत तक्रार केली. आरोग्य यंत्रणेचा ग्रामीण भागातील गावखेडयातील नागरिकांना लाभ होतो की नाही, हे पाहण्यासाठी आरोग्य देखरेख समिती कार्यरत आहे. मात्र, या सभेत वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्याने सभेतील तक्रारी संबंधितांकडे सोपविण्यात याव्यात, असे गुंबळे यांनी सुचविले. या बैठकीला वरिष्ठ आरोेग्य अधिकारी अनुपस्थित असल्याने उपिस्थतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ औपचारिकतेसाठी सभेचे आयोजन होते काय? समस्या सोेड्विण्याची मागणीही केली, असा सवाल करण्यात आला. संचालन सोमेश्वर तर आभार प्रदर्शन मनू वरठी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)