शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

बिबट्याचा विद्यापीठाबाहेर संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 6:00 AM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्यांच्या जोडप्यासह दोन पिले असल्याचे यापूर्वी ट्रॅप कॅमेºयात कैद झाले. विद्यापीठाच्या पूर्वेकडील भागात बिबट्याचे वास्तव्य सतत दिसून आले आहे. ते तलाव परिसर, मुलींचे वसतिगृह, कुलगुरू बंगला, शारीरिक शिक्षण विभाग, एमबीए विभाग, रसायनशास्त्र विभाग, क्रिकेट मैदान आदी विद्यापीठ परिसरात दिसून आले आहेत.

ठळक मुद्देशिकारीसाठी नागरी वस्तीत शिरकाव : विद्यापीठात श्वानांची संख्या झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या दोन वर्षांपासून वडाळी, पोहरा जंगल ते विद्यापीठ असा प्रवास करणाऱ्या बिबट्याने आता नागरी वस्तीत शिरकाव केला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुत्र्यांच्या शिकारीसाठी येणाऱ्या बिबट्याला आता सावज मिळत नसल्याने त्याने विद्यापीठाबाहेरील रस्ता धरल्याचे घटना २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी निदर्शनास आली. बिबट्या शिकारीसाठी विद्यापीठाच्या बाहेर पडला असून, तो भविष्यात मनुष्यासाठी धोकादायक ठरणार आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्यांच्या जोडप्यासह दोन पिले असल्याचे यापूर्वी ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले. विद्यापीठाच्या पूर्वेकडील भागात बिबट्याचे वास्तव्य सतत दिसून आले आहे. ते तलाव परिसर, मुलींचे वसतिगृह, कुलगुरू बंगला, शारीरिक शिक्षण विभाग, एमबीए विभाग, रसायनशास्त्र विभाग, क्रिकेट मैदान आदी विद्यापीठ परिसरात दिसून आले आहेत. विद्यापीठात बिबट्याची ये-जा नेहमीचीच झाली आहे. तथापि, २४ ऑक्टोबरला सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास विद्यापीठाच्या बाहेरील भागात दंत महाविद्यालय मार्गालगतच्या एका घराच्या भिंतीशेजारी शिकारीसाठी दडून बसला होता. विद्यापीठाचे कंत्राटी कर्मचारी दीपक पाटील हे यावेळी सायकलने वडाळी येथे आपल्या घरी निघाले होते. याचवेळी मागाहून आलेल्या दुचाकीच्या आवाजाने गोंधळलेल्या बिबट्याने लांब उडी घेतली आणि पाटील यांच्या सायकलपुढून एसटी महामंडळाच्या कार्यशाळेच्या दिशेने गडप झाला. बिबट्या अचानक पुढून गेल्याने माझी भंबेरी उडाली होती, असे दीपक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विद्यापीठाच्या दर्शनी भागापुढील हा मार्ग वर्दळीचा असून, येत्या काळात या भागातील नागरी वस्त्यांमधील रहिवाशांसाठी बिबट्यांचा वावर ही बाब धोकादायक मानली जात आहे.चालकाने एटीएमजवळ बघितला बिबटविद्यापीठात बॅक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमजवळ बिबट्या रस्त्याने जात असल्याचे चालक म्हणून कार्यरत महेंद्र देशमुख यांनी २४ ऑक्टोबरला बघितले. एटीएम हा परिसर परीक्षा विभागानजीक आहे. या भागात सतत वर्दळ असते. बिबट्या शिकारीसाठी तलाव परिसरातून कुलगुरू बंगला, मुलींचे वसतिगृह व पुढे उद्यान विभाग असे मार्गक्रमण करीत असल्याचा अंदाज आहे.कंत्राटी कर्मचारी पाटील यांच्या सायकलसमोरून बिबट्याने उडी घेतल्याची माहिती मिळताच वनविभागाला कळविण्यात आले. बिबट्या विद्यापीठाबाहेरील भागात आल्याने ही बाब येत्या काळात नागरी वस्त्यांसाठी धोक्याची ठरणारी आहे. विद्यापीठात कुत्र्यांची संख्या रोडावली असो वा नसो, बिबट्याचा बंदोबस्त महत्त्वाचा आहे.- रवींद्र सयाम, सहायक कुलसचिव, सुरक्षा विभाग, विद्यापीठ

टॅग्स :leopardबिबट्या