शहरात पोलिसांचे कोम्ब्ािंग आॅपरेशन

By Admin | Updated: May 6, 2015 00:25 IST2015-05-06T00:25:25+5:302015-05-06T00:25:25+5:30

शहरातील गुन्हेगारीवर अकुंश लावण्यासाठी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी पहाटे ४ ते सकाळी ७...

Coming operation of police in the city | शहरात पोलिसांचे कोम्ब्ािंग आॅपरेशन

शहरात पोलिसांचे कोम्ब्ािंग आॅपरेशन

९७ आरोपी ताब्यात : पहाटे ४ ते ७ वाजेपर्यंत चालली मोहीम
अमरावती : शहरातील गुन्हेगारीवर अकुंश लावण्यासाठी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी पहाटे ४ ते सकाळी ७ वाजेपर्यंत दहा पोलीस ठाण्यांतर्गत कोम्बिंग आॅपरेशन चालविले. त्यामध्ये ९७ गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये पाच तडिपार आणि सहा फरार आरोपीचा सहभाग आहे.
दरवर्षी उन्हाळयात चोरीच्या घटना वाढत असल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे. त्याअनुषंगाने गुन्हेगारी क्षेत्रावर अकुंश लावण्याकरिता घार्गे यांनी पुढाकार घेतला. मंगळवारी कोम्बिंग आॅपरेशन चालवून १० पोलीस ठाण्यांतर्गत विविध परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांच्या घराची झाडाझडती घेतली. प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांच्या नेत्तृत्वात दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, १० पोलीस निरीक्षक, ३५ पोलीस उपनिरीक्षक आणि १०० पोलीस शिपाई तसेच सर्व ठाण्याच्या डिबी पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत ९७ गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले असून त्यामध्ये कुख्यात गुन्हेगारांचाही समावेश आहे. काही वर्षांपासून फरार असणाऱ्या सहा आरोपींनाही कोम्बिंगमध्ये अटक करण्यात आलीे. याव्यक्तिरिक्त राजापेठ आणि गाडगेनगर ठाण्यांतर्गत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला. कोतवाली ठाण्यांतर्गत परिसरात शेख जावेद आणि सैयद असिम या दोन युवकांना चोरी प्रकरणात अटक करण्यात आले असून त्यांच्याजवळून चोरीतील फावडे व किटकनाशक फवारणीचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच शेख नईम व अफरोज खान या दोन आरोपींना दुचाकी चोरी प्रकरणात अटक करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची चौकशी करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. चौकशीमध्ये आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. शहरात ठिकठिकाणी कोम्बिंग आॅपेरशन चालविल्याने गुन्हेगारी क्षेत्रावर वंचक बसली आहे.

Web Title: Coming operation of police in the city