शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ अभियान प्रारंभ

By admin | Updated: September 29, 2014 00:33 IST

भारत सरकारने २ आॅक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छ भारत स्वच्छ अभियान’ राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानचा एक भाग म्हणून २५ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान

गजानन मोहोड - अमरावतीभारत सरकारने २ आॅक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छ भारत स्वच्छ अभियान’ राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानचा एक भाग म्हणून २५ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्याचे सूचित करण्यात आले आहे. ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या मोहिमेंतर्गत सर्व शाळांमधून स्वच्छतेविषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा सक्रिय व उत्स्फूर्त सहभाग आवश्यक असल्याचे मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्लीच्या अतिरिक्त सचिव वृंदा स्वरुप यांनी कळविले आहे. हा उपक्रम किंवा यापेक्षा वेगळे स्वच्छता व आरोग्यविषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना आहे. राज्यात विधानसभा निवडणूक असल्याने आदर्श आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याविषयी शिक्षण विभागाला कळविण्यात आले आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका तसेच विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याची कायम जबाबदारी शासनाने घेतली आहे. शिक्षणामधून चांगल्या कलागुणांची जोपासना करण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक व आनंददायी वातावरण मिळाले तर त्यांची शाळेबाबतची गोडी अधिक प्रमाणात वाढतील. परिणामत: विद्यार्थिनींची उपस्थिती वाढेल, शालेय उपक्रमातील सहभाग व एकंदरीतच दर्जेदार शिक्षण यामध्ये सकारात्मक बदल होण्यास मदतच होईल, याच भूमिकेतून पंचप्रधानांचा विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादानंतर हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. याचा परिणाम चांगले होण्याची अपेक्षा आहे.