‘कोविड सेंटर’ला विरोध, शेगाव-राहटगाव मार्गावर नागरिकांचा चक्काजाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 22:42 IST2020-08-19T22:42:02+5:302020-08-19T22:42:29+5:30
अमरावती : शेगाव- राहटगांव मार्गावर असलेल्या ‘तुळजा भवानी’ व ‘विनयविला मंगल’कार्यालयात कोविड १९ सेंटर सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त ...

‘कोविड सेंटर’ला विरोध, शेगाव-राहटगाव मार्गावर नागरिकांचा चक्काजाम
अमरावती : शेगाव- राहटगांव मार्गावर असलेल्या ‘तुळजा भवानी’ व ‘विनयविला मंगल’कार्यालयात कोविड १९ सेंटर सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त व जिल्हा प्रशासनाने घेतल्याची माहिती नागरिकांना कळताच लोकवस्तीत कोविड सेंटर सुरु करु नये, याला विरोध करुन या परिसरातील शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरुन शेगाव मार्गावर बुधवारी सकाळी १०.५० ते ११.३० वाजता एक तास चक्काजाम आंदोलन छेडले. त्याकारणाने या मार्गावरील वाहतूक काही वेळी ठप्प झाली होती.
नागरिकांनी चक्काजाम आंदोलन छेडल्याची माहिती मिळताच गाडगेनगर व नांदगावपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. त्यांनी आंदोलकांची समजून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र असंख्य महिला वर्ग आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांनी लोकवस्तीत कोविड सेंटरची उभारणी करुन नये अशी जोरदार मागणी केली.