शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
3
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
4
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
5
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
6
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
7
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
8
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
9
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
10
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
11
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
12
"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
13
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
15
'इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही', ट्रम्प यांच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली
16
Gold Silver Price Today May 16: चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट
17
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
18
‘काही बेरोजगार हे झुरळासारखे, ते पुढे आरटीआय कार्यकर्ते बनतात’, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्याला  सुनावले
19
न्यायालयावर निर्णय लांबविण्याचा आरोप करणे थांबवा; कोर्टाचा उद्धवसेनेला इशारा
20
आर्थिक संकट, सोन्याची दरवाढ, अन्...; बाबा वेंगाने २०२६ बाबत वर्तवली होती काळजीत टाकणारी भाकितं! खरी ठरणार? 
Daily Top 2Weekly Top 5

बाळ-बाळंतिणींचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: May 19, 2014 23:07 IST

या ना त्या निमित्ताने सदैव चर्चेत राहणार्‍या जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेचा मुद्दासुध्दा सदैव चर्चेत असतो. या घाणीमुळे व दुर्गंधीमुळे बाळ-बाळंतिणींच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

डफरीनमध्ये गलिच्छ वातावरण : रूग्णांसह नातेवाईकही हैराण

वैभव बाबरेकर - अमरावती

या ना त्या निमित्ताने सदैव चर्चेत राहणार्‍या जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेचा मुद्दासुध्दा सदैव चर्चेत असतो. या घाणीमुळे व दुर्गंधीमुळे बाळ-बाळंतिणींच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

डफरीनमध्ये जन्माला येणार्‍या बालकांना जन्मल्याबरोबर घाण आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गलिच्छ वातावरणातच महिला प्रसूत होतात. त्यामुळे गरोदर महिला आणि जन्माला येणार्‍या बालकांना रोगराईची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डफरीन रूग्णालयातील घाण, केरकचरा आणि दुर्गंधीमुळे रूग्णांसह नातेवाईकही हैराण झाले आहेत.

याबाबत कित्येकदा तक्रारी करण्यात आल्या. परंतु याकडे डफरीन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

प्रवेशद्वारापासून दुर्गंंधी

अनेक दिवसांपासून रूग्णालय परिसरात असे घाणेरडे वातावरण आहे. परंतु आजपर्यंत रुग्णालय प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. लोकप्रतिनिधीसुध्दा या प्रश्नाबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणार्‍या रूग्णांना व शहरातील गोरगरीब रूग्णांना नि:शुल्क आरोग्य सेवा पुरविण्याकरिता शासनाने प्रत्येक शहरात सामान्य रुग्णालयांची व्यवस्था केली; मात्र शहरातील शासकीय रुग्णालयांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. अनेकदा नागरिकांनी शासकीय रुग्णालयाच्या कारभाराविरुध्द आक्षेपही घेतले आहेत. तरीही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही.

रुग्णालयाची स्थिती सुधारण्याकरिता राजकीय पक्षांनी अनेक आंदोलनेसुध्दा केली. तरी देखील काहीच उपयोग झाला नाही. रूग्णालयाच्या आवारात प्रवेश करताच तीव्र उग्र दुर्गंंदी नाकात शिरते. त्यावरून या रूग्णालयातील स्थितीची कल्पना येते. रूग्णालय परिसरातील नाल्या घाणीने तुंडूंब भरल्या आहेत. आवारात कुत्रे व डुक्करांचा नेहमीच वावर असतो. सर्वत्र गलिच्छ वातावरण दिसून येते. यामुळे प्रसूत महिला रूग्णांच्या आरोग्याला धोका संभवतो. (प्रतिनिधी)

जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या आवारात अशी घाण साचली आहे. कुजलेल्या या घाणीमुळे दुर्गंंधी पसरली आहे.