शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बाळ-बाळंतिणीचा मृत्यू, रुग्णालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2016 00:06 IST

बाळबाळंतीणीच्या मृत्यूनंतर बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मृतांच्या नातेवाईकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ....

स्वस्तिकनगरातील घटना : उपचारात हयगय केल्याचा डॉक्टरवर आरोप, नातेवाईकांची राजापेठ ठाण्यात तक्रारअमरावती : बाळबाळंतीणीच्या मृत्यूनंतर बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मृतांच्या नातेवाईकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी स्वस्तीक नगरातील एका खासगी रुग्णालयाची तोडफोड केली. डॉक्टर वासंती कडू यांनी उपचारात हयगय केल्यामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात नातेवाईकांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. वडरपूरा येथील रहिवासी राजश्री नरेश ठाकूर (२७) यांना प्रसूती वेदना होत असल्याने मंगळवारी दुपारी स्वस्तिक नगरातील वासंती कडू यांच्या रूग्णालयात नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार सुरु केले. मात्र, राजश्री यांची गंभीर प्रकृती बघून डॉक्टरांनी त्यांना जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. त्यानंतर तिला डफरीन रूग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी राजश्री यांची तपासणी केली असता त्यांच्या पोटातील बाळ दगावल्याचेलक्षात आले. पोटातून मृत बाळ काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच रात्री १२ वाजताच्या सुमारास राजश्री हिचाही मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी राजश्रीच्या मृत्यूसाठी प्रसूतितज्ज्ञ वासंती कडू यांनाच कारणीभूत ठरवित संताप व्यक्त केला. घटनेची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहराध्यक्ष संजय गवारे यांना मिळताच त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्रीच राजापेठ पोलीस ठाणे गाठून वासंती कडू यांच्याविरुध्द तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकशीअंती कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली. त्यामुळे बुधवारी सकाळी मृताच्या नातेवाईकांसह मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी प्रसूतीतज्ज्ञ वासंती कडू यांच्या रूग्णालयाची तोडफोड सुरु केली. कार्यकर्ते व नातेवाईकांनी डॉक्टरांची एम.एच. २७ एच.-२८० क्रमांकाचे वाहन, त्यांचा कक्ष, ओटी रुम, लेबर रूमची तोडफोड केली. याबाबत डॉक्टरांनी पोलिसांत तक्रार केलेली नाही. मात्र, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांचीही ताराबंळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच प्रहारचे रोशन देशमुख यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना पाठबळ दिले.प्राथमिक चौकशीनंतर बाळ-बाळंतिणीचा डफरीनमध्ये मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. त्यामध्ये वासंती कडू यांचा संबंध नाही. मृताच्या नातेवाईकांनी तक्रार दिली आहे. अद्याप डॉक्टर कडू यांनी तक्रार केलेली नाही. - पी.बी.पाटील,पोलीस उपनिरीक्षकपंधरवड्यापूर्वीच महिलेला सिझेयिनचा सल्ला दिला होता. मंगळवारी तिला अत्यवस्थ अवस्थेत रूग्णालयात आणण्यात आले. येथे आयसीयू नसल्याने डफरीनला हलविण्यास सांगितले. मात्र, तिच्या मृत्यूनंतर नातलगांनी रूग्णालयाची तोडफोड केली. - डॉ. वासंती कडू