शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मुख्यमंत्री साहेब, मुंबईत दुष्काळ नाही!

By admin | Updated: March 13, 2016 00:14 IST

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. परंतु मुंबईत दुष्काळ का पडत नाही. इथे जास्त पाऊ स आला तरी मरण आणि नाही आला तरीही मरण.

बच्चू कडू : राज्यस्तरीय कृषी समृध्दी योजना, कृषी प्रदर्शनीचे उद्घाटनपरतवाडा : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. परंतु मुंबईत दुष्काळ का पडत नाही. इथे जास्त पाऊ स आला तरी मरण आणि नाही आला तरीही मरण. शेतकऱ्यांना अगोदर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, मगच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा. वारकऱ्यांनी वारकरी झेंड्यासोबत शेतकऱ्यांचा झेंडा घेऊन मुंबई गाठली तर सरकारची फजिती होईल, असे मत बच्चू कडू यांनी मांडले. अचलपूर बाजार समितीत आयोजित राज्यस्तरीय कृषी समृध्दी महोत्सव, शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी किरण गीत्ते, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार मनोज लोणारकर, बाजार समितीचे संचालक मनोहर जाधव, सतीश व्यास, गजानन मोरे, सुधीर रहाटे, तालुका कृषी अधिकारी ए.बी. जाधव शेतकरी समृध्दी संस्थेचे यशवंत पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, २००६ पासून स्वामिनाथन आयोगाने शेतकऱ्यांच्या ज्या शिफारशी केल्या त्या लागू केल्यास आत्महत्या थांबतील. मात्र सत्ताधाऱ्यांना त्यांचे काही एक घेणे, देणे नाही. सातवा वेतन आयोग लागू करताना कर्मचारी महिन्याला तीन हजार रुपयांचे मटन खाणार त्यावर त्याचे वेतन ठरविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकाव्यात. दुष्काळ शहरात नाही, खेड्यात आहे. तेथे आजही पाणी, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधांचा अभाव आहे. दुसरीकडे जलयुक्त शिवारामुळे मोठ्या प्रमाणात चांगली कामे झाल्याची पावती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बच्चू कडूंनी अभिनंदन केले. (प्रतिनिधी)देशातील पहिला प्रयोग अचलपुरातप्रकल्पात सौरपंपाचा उपयोग करुन कोरडवाहू शेतींना पाणी देत ओलिताखाली आणण्याचे कार्य करण्याचा प्रयोग देशात पहिल्यांदा अचलपूर मतदारसंघात राबविण्याची तयारी आ. बच्चू कडू यांनी दर्शविली. एका नाल्यातून दुसऱ्या नाल्यात तेथून शेतीला व शेतकऱ्यांचे पाणी सौर पंपाव्दारे देण्याचा प्रयोग करण्यात येणार असल्याचे आ.बच्चू कडू यांनी प्रदर्शनीदरम्यान सांगितले. एक तालुका संपलाराज्यात साडेतीन लक्ष शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. ही आकडेवारी पाहता जवळपास नकाशातून एक तालुका संपला एवढी गंभीर अवस्था शेतकऱ्यांची झाली असल्याचे कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी आ. बच्चू कडू यांनी सांगितले. अगोदर स्वामिनाथन आयोग लागू करा, मगच सातवा वेतन आयोग द्या, असे ते म्हणाले.बियाण्यांचे सॉफ्टवेअर राज्यात पहिला प्रयोग अचलपुरातशेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक बियाण्यांपासून होते. तेव्हा एक तालुक्याला किती कोणत्या वाणांचे किती बियाणे लागते, ते उत्कृष्ट की निकृष्ट याचे नवीन तंत्रज्ञान सॉफ्टवेअर तयार करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपण केली आहे. त्यामुळे देशातील पहिला प्रयोग अचलपूर मतदारसंघात करण्यात येणार असल्याचे आ. बच्चू कडू यांनी यावेळी जाहीर केले. जलयुक्त शिवारातून यशस्वी कार्यजिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात यशस्वी कामे करण्यात आली आहे. सोलर पंप अंतर्गत जिल्ह्यात एकूण १७०० पंपाचे उद्दिष्ट असून केवळ ३० टक्के रक्कम भरून हा पंप शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. यासाठी ८०० शेतकऱ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी केवळ दीडशे शेतकऱ्यांनीच रक्कम भरल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली.