शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

अमरावती विभागात ३४ महाविद्यालयांच्या मान्यतेवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 7:47 PM

अमरावती विद्यापीठ अंतर्गत १५२ अनुदानित महाविद्यालये असून, त्यापैकी ३४ महाविद्यालयांनी अद्यापही राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडून (नॅक) मान्यता मिळवली नाही.

- गणेश वासनिकअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत १५२ अनुदानित महाविद्यालये असून, त्यापैकी ३४ महाविद्यालयांनी अद्यापही राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडून (नॅक) मान्यता मिळवली नाही. ही बाब विद्यापीठ अनुदान आयोग व  महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ च्या नियमांच्या विसंगत आहे. त्यामुळे अगोदर ‘नॅक’नंतरच अनुदान असा पवित्रा येथील उच्च व शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी घेतला आहे. ‘नॅक’ मानांकनासाठी डिसेंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. अन्यथा महाविद्यालयाच्या मान्यता रद्दचा प्रस्ताव पाठविला जाईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार अनुदानित महाविद्यालयांनी विद्यार्थी आणि शैक्षणिक बाबीसंदर्भात मिळणारे अनुदान खर्च करणे अपेक्षित आहे. महाविद्यालयात शैक्षणिक विषयाशी निगडीत पायाभूत, मूलभूत सोईसुविधा पुरविण्यात आल्या अथवा नाहीत, याची तपासणी ‘नॅक’ समितीमार्फत करणे नियमावली आहे. मात्र, यात काही महाविद्यालये राजकीय आशीर्वादाने उभी आहेत. तर, काही महाविद्यालये शिक्षण सम्राटांची आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांना अद्ययावत सुविधा न देता तशीच ही महाविद्यालये सुरु असल्याचे चित्र आहे. अमरावती विभागात गत २० ते २५ वर्षांपासून काही महाविद्यालयांनी नॅक मानांकन झाले नाही, अशी धक्कादायक बाब उच्च व शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली आहे. परिणामी गत दीड महिन्यापासून ‘नॅक’पासून वंचित महाविद्यालयांचे मानांकन प्रक्रिया करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यात अकोला जिल्ह्यात ९, बुलडाणा ४, वाशिम ४, यवतमाळ ११, तर अमरावती जिल्ह्यातील ६ महाविद्यालयांच्या समावेश आहे. ‘नॅक’ मानांकन झाल्यानंतर सदर महाविद्यालयांना यूजीसीच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करावी लागेल, अशा सूचना उच्च व शिक्षण विभागाने दिल्या आहेत.    कोट अनुदानित महाविद्यालयांना ‘नॅक’ मानांकन अनिवार्य आहे. परंतु, अमरावती विभागात ३४ अनुदानित महाविद्यालयांचे ‘नॅक’ झाले नाही. त्यामुळे या महाविद्यालयांच्या संचालकांना नोटीस बजावून डिसेंबरपर्यंत ‘नॅक’ मानांकनाची डेडलाईन देण्यात आली आहे. अन्यथा त्या महाविद्यालयांच्या मान्यता रद्दचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाईल.     - केशव तुपे,   सहसंचालक, उच्च व शिक्षण अमरावती.