‘एफडीए’द्वारे चंदामामा गृहउद्योगची झाडाझडती

By Admin | Updated: May 4, 2017 00:05 IST2017-05-04T00:05:37+5:302017-05-04T00:05:37+5:30

चिवड्यामध्ये तळलेली पाल आढळल्याप्रकरणी एफडीएने विक्रेता मातेश्वरी सेल्सवर धाड टाकून चिवड्याचा नमूना मंगळवारी घेतला.

Chandamama tree plantation by FDA | ‘एफडीए’द्वारे चंदामामा गृहउद्योगची झाडाझडती

‘एफडीए’द्वारे चंदामामा गृहउद्योगची झाडाझडती

त्रुटी आढळल्या : खटला दाखल करणार
अमरावती : चिवड्यामध्ये तळलेली पाल आढळल्याप्रकरणी एफडीएने विक्रेता मातेश्वरी सेल्सवर धाड टाकून चिवड्याचा नमूना मंगळवारी घेतला. याच दिवशी उशिरा रात्री एफडीएच्या अधिकाऱ्यांनी चिवड्याचे मूळ उत्पादक रामपुरी कॅम्प परिसरातील चंदामामा गृहउद्योवर धाड टाकून येथील संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी एफडीएला अनेक त्रुटी आढळून आल्यात.
संजय गांधीनगरातील रहिवासी शरद महादेव पखाले यांनी शामनगरातील मातेश्वरी सेल्समधून खरेदी केलेल्या चिवड्याच्या पाकिटात तळलेली पाल आढळली होती. याप्रकरणी तक्रार त्यांनी आधी लोकमतकडे व त्यानंतर मातेश्वरी सेल्सकडे केली होती. याबाबतचे सचित्र वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी विक्रेता मातेश्वरी सेल्स प्रतिष्ठानवर धाड टाकून चिवड्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला. मात्र, सेल्समनने हा माल विकल्याची माहिती मातेश्वरी सेल्सच्या संचालकांनी दिली होती. चिवड्याच्या पाकिटाची तपासणी केली असता ‘जैन’ उत्पादनाच्या नावे विकला जाणारा चिवडा रामपुरी कॅम्प परिसरातील ‘चंदामामा गृहउद्योग’चे उत्पादन असल्याचे उघडकीस आले.

उत्पादनाच्या
तारखेची नोंद बेपत्ता
अमरावती : याच दिवशी उशिरा रात्री एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलीपकुमार मिहालाल शिवनानी यांच्या ‘चंदामामा गृहउद्योग’वर धाड टाकून येथील एकूण व्यवस्थेची झाडाझडती घेतली असता येथे अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. एफडीएने यासंदर्भात चंदामामा गृहउद्योगला नोटीस बजावली आहे. तपासणीदरम्यान कारखान्यात प्रचंड अस्वच्छता आढळून आली. स्वच्छतेचे निकष पाळण्यात येत नसल्याने याबाबत जाब विचारला आहे.
एफडीएच्या तपासणीदरम्यान चिवड्याच्या पॅकिंगवर उत्पादनाची तारीख आढळून आली नाही. काही पाकिटांवर तर परवाना क्रमांक देखील नव्हता. शिवाय पत्ताही अपूर्ण आढळून आला. यासह अनेक त्रुटी आढळल्याने येथे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निरीक्षण एफडीएने नोंदविले.

कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नाही
चंदामामा गृहउद्योगमध्ये ७ ते ८ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी देखील झाली नसल्याची बाब या तपासणी दरम्यान दिसून आली. यासर्व त्रुटींबाबत एफडीएद्वारे चंदामामा गृहउद्योगला नोटीस बजाविली आहे.

रामपुरी कँप परिसरातील चंदामामा गृहउद्योगच्या कारखान्याची तपासणी केली असून त्यांना विविध त्रुटींसंदर्भात नोटीस बजावली आहे.
- आर.एस.वाकोेडे
अन्न सुरक्षा अधिकारी, अमरावती.

Web Title: Chandamama tree plantation by FDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.