शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

१३ सप्टेंबर रोजी तुरळक पावसाची शक्यता

By admin | Updated: September 10, 2016 00:12 IST

यंदाच्या मोसमात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सध्य पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

हवामानाचा अंदाज : बळीराजाला प्रतीक्षाअमरावती : यंदाच्या मोसमात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सध्य पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. मात्र १३ सप्टेंबर रोजी तुरळक, तर १५ सप्टेंबरनंतर सर्वत्र पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.पावसाने गत महिन्याभरापासून दडी मारल्याने शेतकरी पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करु लागला आहे. खरीप हंगामातील मूग बाजारात विक्रीसाठी दाखल झाला असला तरी अवेळी पडलेल्या पावसामुळे मुगाचे पीक खालावल्याचे चित्र आहे. पाऊस गायब झाल्यामुळे पाण्याअभावी सोयाबीन पीक ‘कोमात’ गेले आहे. या आठवड्यात सोयाबीन पीकाला पाणी मिळाले नाही, तर यंदा सोयाबीन उत्पादनात कमालीची घट होईल, असा अंदाज शेतकरी सुरेश मोलके यांनी वर्तविला आहे. पाण्याअभावी सोयाबीन पिवळे पडत असून शेतकरी वरुण राजाची आतुरतेने वाट बघत आहे. दरवर्षी गणेशोत्सवात पावसाचे आगमन राहते. परंतु यंदा गणेशोत्सव प्रारंभ होऊन पाच दिवसांचा कालावधी लोटला असताना पावसाचा अजूनही पत्ता नाही. मात्र येत्या २४तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून मध्यप्रदेशात चक्रकार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे १२ सप्टेंबरपासून पावसाचे वातावरण तयार होण्यास हे वातावरण पोषक ठरणारे आहे. पावसासाठी वातावरण सुधारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. १३ सप्टेंबर रोजी तुरळक तर १५ पासून सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. वातावरणात प्रचंड बदल झाला आहे. येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार होण्याचे संकेत आहेत. तसेच मध्यप्रदेशात चक्राकार वारे वाहू लागल्याने पावसासाठी वातावरण तयार होत आहे. १३ सप्टेंबर रोजी तुरळक तर १५ सप्टेंबरपासून पाऊस बरसण्याची शक्यता आहे.- अनिल बंड,हवामानतज्ज्ञ, अमरावती