'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता भारत गणेशपुरे यांना मातृशोक

By गणेश वासनिक | Updated: March 9, 2023 14:29 IST2023-03-09T14:25:16+5:302023-03-09T14:29:56+5:30

गुरुवारी पहाटे घेतला अखेरचा श्वास

'Chala Hawa Yeu Dya' fame actor Bharat Ganeshpure mother passed away | 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता भारत गणेशपुरे यांना मातृशोक

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता भारत गणेशपुरे यांना मातृशोक

अमरावती : सिने अभिनेता तथा ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांच्या मातोश्री मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे (८३) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे ४.३० निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ५.३० वाजता रहाटगाव येथील मुक्तगड सान्वी बिल्डींग या निवासस्थानातून निघणार आहे.

मनाेरमाबाई यांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार अमरावती येथील दिशा फांऊडेशनने मृत्युपश्चात नेत्रदानाची प्रक्रिया सकाळीच पार पडली. मनोरमाबाई यांना एकूण चार अपत्ये होती.  त्यापैकी एक मुलगा, एका मुलीचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात भारत, मनीष ही दोन मुले, स्नुषा नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: 'Chala Hawa Yeu Dya' fame actor Bharat Ganeshpure mother passed away