शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
3
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
4
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
5
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
6
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
7
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
8
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
9
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
10
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
11
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
12
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
13
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
14
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
15
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
16
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
17
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
18
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
19
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 

कॅज्युअल अ‍ॅटिट्यूड महावितरण कर्मचाऱ्यांना भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:41 AM

वारंवार आढावा घेतल्यानंतरही परिमंडळातील काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वीज बिलाची वसुली आणि ग्राहकांना पुरविण्यात येणाºया सेवेत सुधारणा नाही.

ठळक मुद्देआढावा बैठक : कर्मचाºयांच्या गोपनीय अहवालात कामाची नोंद

ऑनलाईन लोकमतअमरावती : वारंवार आढावा घेतल्यानंतरही परिमंडळातील काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वीज बिलाची वसुली आणि ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवेत सुधारणा नाही. यासंदर्भात कॅज्युअल अ‍ॅटिट्यूड असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल व त्यांच्या कामाची नोंद गोपनीय अहवालात घेतली जाईल, तर चांगले काम करणाऱ्यांचा गौरव केला जाणार असल्याचे महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्यासह प्रभारी मुख्य अभियंता सुहास मेत्रे, अधीक्षक अभियंता रामेश्वर माहुरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. महावितरण दररोज सुमारे १८ हजार मेगावॅट वीज ही विविध खासगी व शासकीय स्रोतांकडून खरेदी करून ती आपल्या ग्राहकांपर्यंत वहन करते. महावितरणच्या उत्पनाचा ८७ टक्के खर्च हा फक्त वीज खरेदीवर होतो. त्यामुळे ग्राहकांना वापरलेल्या विजेचे पैसे वेळेत भरण्याची शिस्त लावणे गरजेचे असल्याचेही खंडाईत म्हणाले.ग्राहकांना अचूक बिल, दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी विभाग, जिल्हा आणि परिमंडळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कामाचे टार्गेट देण्यात आले. ग्राहकांना चुकीचे बिल देणाºया तसेच महावितरणचे नुकसान करणाऱ्या मीटर रीडरचे आधार कार्ड बंद केल्याने त्याला पुन्हा काम मिळणार नाही. त्या एजन्सीलाही ब्लॅकलिस्ट करणे तसेच शहरातील भाजीबाजार, कडबीबाजार या ठिकाणी वीजचोरीचे प्रमाण जास्त असल्याने अशा ठिकाणी वीजचोरीवर आळा घालण्यासाठी एरियल बंच केबल टाकण्याचे निर्देश प्रादेशिक संचालकांनी दिले.दिनेश भागवतांना झालेली मारहाण निंदनीयअचलपूर येथे सहायक अभियंता दिनेश भागवत यांना ग्राहकांकडून झालेली मारहाण ही अत्यंत निंदनीय असून, वीज कर्मचाºयांवर होणाºया मारहाणीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता, महावितरणचे प्रादेशिक संचालक प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. याशिवाय आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि कठोर शिक्षा व्हावी, याकरिता स्थानिक मंडळ प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही प्रादेशिक संचालकांनी दिले.