संभाजी भिडे यांच्याविरुध्द अमरावतीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 06:37 IST2023-07-30T06:36:09+5:302023-07-30T06:37:25+5:30

भिडेंना अटक करावी या मागणीसाठी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

Case against Sambhaji Bhide in Amravati | संभाजी भिडे यांच्याविरुध्द अमरावतीत गुन्हा दाखल

संभाजी भिडे यांच्याविरुध्द अमरावतीत गुन्हा दाखल

अमरावती : महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून असंतोष पसरवणे आणि दोन समाजांत तेढ निर्माण करणारे भाष्य केल्याच्या आरोपाखाली शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (रा. सांगली) यांच्यासह कार्यक्रम आयोजक निशांदसिंह जोध, अविनाश मरकल्ले व इतरांविरुद्ध राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. 

भिडेंना अटक करावी या मागणीसाठी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यवतमाळ येथे भिडे यांचे पोस्टर फाडण्यात आले. भिडे यांच्यावर न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी यांनी सांगितले. 
 

Web Title: Case against Sambhaji Bhide in Amravati