आॅनलाईन लोकमतअमरावती : धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने शुक्रवारी रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली होती. या आगीत अमोल खोब्रागडे यांची एमएच ४३ -एल-१५८१ क्रमांकाची कार भस्मसात झाली.अमोल खोब्रागडे एमआयडीसी मार्गाने जात असताना अचानक कारने पेट घेतला. त्यांनी कार थांबवून जीव वाचविला. या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांनी अग्निशमनला माहिती देताच काही वेळातच एमआयडीसी व महापालिका अग्निशमन दलाचे दोन पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन अधीक्षक भरतसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात फायरमन कपले, यादव, बाटे व चालक तंबोले, चौबळे यांनी कारला विझविण्याचे प्रयत्न सुरु केले होते. या आगीमुळे कार जळून खाक झाली असून वायरिंंग शॉट सर्किंटमुळे आग लागल्याचे कारण पुढे आले आहे.
एमआयडीसी परिसरात कार पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:15 IST
धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने शुक्रवारी रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली होती.
एमआयडीसी परिसरात कार पेटली
ठळक मुद्देखळबळ : शॉर्ट सर्किटची शक्यता