शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

वनमंत्र्यांचा दौरा रद्द, वनपरिषदेचा आत्मा हरपला, राज्यभरातून वरिष्ठ वनाधिका-यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 10:19 PM

राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अमरावतीत आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय वनपरिषदेला शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी येणार होते. मात्र, अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याने वनपरिषदेचा जणू आत्माच हरविल्याचे चित्र दिसून आले.

अमरावती, दि. 15 - राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अमरावतीत आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय वनपरिषदेला शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी येणार होते. मात्र, अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याने वनपरिषदेचा जणू आत्माच हरविल्याचे चित्र दिसून आले.येथील डॉ. पंजाबराव देशमुख विकास प्रबोधिनीत १५ व १६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय वनपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला राज्यभरातून शेकडो वरिष्ठ वनाधिका-यांनी आवर्जुन हजेरी लावली आहे. परिषदेला वनमंत्री येणार असल्याने वरिष्ठ वनाधिका-यांनी अजेंड्यानुसार आवश्यक ती माहिती देखील सोबत आणली. मात्र ना. सुधीर मुनगंटीवार, ना. राजे अंबरीशराव यावनखात्याशी संबंधित दोन्ही मंत्र्यांचे दौरे रद्द झाले आहेत. त्यामुळे या वनपरिषदेची धुरा प्रधान मुख्य वनसंक्षरक भगवान, प्रधान मुख्य वनसचिव विकास खारगे यांनी सांभाळली आहे.ही दोन दिवसीय परिषद यशस्वी व्हावी, कोणतीही उणिव राहू नये, यासाठी अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात शेकडो वनाधिकारी, कर्मचाºयांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु वनमंत्री मुनगंटीवार उपस्थित न राहिल्याने ही परिषद वरिष्ठ वनाधिकाºयांसाठी केवळ औपचारिक ठरली. यापरिषदेला चांदाते बांद्यापर्यंतचे सर्व वरिष्ठ वनाधिकारी उपस्थित झालेत. काही वरिष्ठ वनाधिकाºयांनी वनविकासाबाबतचा नवा आराखडा देखील सोबत आणला. मात्र, वनमंत्र्यांची अनुपस्थिती अनेक बड्या अधिकाºयांचा हिरमोड करणारी ठरली.वनसचिव विकास खारगे यांनी वनपरिषदेची धुरा हाती घेऊन भविष्यातील वनविकासाचे ‘ब्लू प्रिन्ट’ त्यांनी वरिष्ठ वनाधिकाºयांना दिले. या दोन दिवसीय परिषदेत वृक्षारोपण, वनविकास महामंडळांच्या योजनांचा आढावा, १ ते ७ जुलै दरम्यान पावसाळ्यातील वृक्षारोपणाचा अहवाल, येत्या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचे जिल्हानिहाय टार्गेट, जमिनींचा अहवाल, १ आॅक्टोबर २०१७ पासून दोन वर्षांत ४६ कोटी वृक्षलागवडीवर मंथन, वृक्षांसाठी ट्री-गार्ड, जनवानिकी विकास योजना, वनविकास आराखडा, बांबूविकास, रस्ता दुर्तफा वृक्षलागवड, ईको टुरिझम यांसह विविध योजनांच्या अंमलबजावणीविषयी यावेळी मंथन करण्यात आले.वनपरिषदेचा आज समारोप...राज्यस्तरीय वनपरिषदेचा समारोप शनिवार १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. राज्याचे प्रधान मुख्यवनसंरक्षक भगवान, प्रधान मुख्य वनसचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाने या परिषदेचे सूप वाजेल, अशी माहिती आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार