शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

कालवे बुजले गाळाने, अस्तरीकरणही उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:30 IST

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरण ठिकठिकाणी फुटले आहे. कालव्यासह लघुकालव्यांत गाळ साचला अन् झाडे-झुडपे वाढली आहेत. यामुळे कुठे पाणी ओसंडून वाहते, तर कुठे प्रवाहच खोळबंतो. त्यामुळे सिंचन दुरापास्त झाले आहे.

ठळक मुद्देसिंचन दुरापास्त : देखभाल दुरूस्तीचा निधी गेला कुठे? शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरण ठिकठिकाणी फुटले आहे. कालव्यासह लघुकालव्यांत गाळ साचला अन् झाडे-झुडपे वाढली आहेत. यामुळे कुठे पाणी ओसंडून वाहते, तर कुठे प्रवाहच खोळबंतो. त्यामुळे सिंचन दुरापास्त झाले आहे. सिंचनामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् होईल, याचा भ्रमनिराश झालेला. यासाठी दरवर्षी असणारा देखभाल दुरूस्तीचा निधी पाण्यासारखा मुरला काय, असा शेतकºयांचा संतप्त सवाल आहे.उर्ध्व वर्धा प्रकल्पातून मोर्शी, तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव या तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. गेल्या दोन दशकापासून रबी सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने आर्थिक स्तर उंचावेल, ही आशा सपशेल फोल ठरली आहे. सिंचनासाठी उपलब्ध होत असताना अनंत अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागतो. मायनरमधून पुरेसे पाणी येत नाही. मधेच पाणी ओसंडून वाहिल्याने शेतापर्यंत पोहोचत नाही. पाणी मिंळण्यासाठी शेतकºयांनी तक्रार दिली. मात्र, त्याची दखलही घेतली गेली नाही. पाटचरीचेदेखील हेच हाल आहे. समतोल पातळीवर पाटचरीच नसल्याने कुठे पाणी मिळते तर कुठे पोहोचतच नाही, अर्ध्याअधिक पाटचरी गाळाने बुजल्या आहेत. सिंचन विभागाकडून पाणी कराची आकारणी केली जात असताना दुरूस्तीकडे कधी लक्षच दिले जात नाही. त्यामुळे ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.यंदा प्रकल्पातच पाणी नसल्याने पाण्याच्या फक्त दोनच पाळ्या देण्यात येणार आहे. त्यापैकी एक पाळी संपली आता तीन आठवड्यांनी दुसरी पाळी देण्यात येणार आहे.पहिल्या पाळीतच सिंचन विभागाची पोलखोल झाली. मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाच्या भेगांमधून पाणी पाझरते आहे. सरळ विमोचकाची गेट खराब झाल्याने पाण्याचे लिकेज, विमोचकांमधून पाणी ओव्हरटॅप होणे, मायनरमध्ये गाळ असल्याने पाणी ओसंडणे आदी कारणामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी नाना संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे दुसऱ्या पाळीपूर्वी या समस्या जर सोडविल्या न गेल्यास यंदाचा हंगामच वाया जाणार, अशी अवस्था या विभागाच्या बेपर्वा धोरणामुळे शेतकऱ्यांची झाली आहे.मुख्य कालवा धोक्यातमुख्य कालव्याच्या किमी ३९ मध्ये तिवस्याजवळ अस्तरीकरणच उखडले आहे. त्यामुळे मुख्य कालव्यात पाणी मुरत असल्याने कालवाच धोक्यात आला आहे. त्यामुळे पाझरून लगतची शेतीपिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. मुळात चार इंचाचे अस्तरीकरण दोन ते तीन इंचातच टाकल्यामुळे अस्तरीकरण उखडत आहे. कालव्यात कचरा गाळ व झाडे पडली आहेत. त्यामुळे पाणी प्रवाहित होण्यास अडसर निर्माण होत आहे.मायनर बुजलेत गाळानं अन् झाडानंमायनर कधी देखभाल दुरूस्तीच केली जात नसल्याने अनेक ठिकाणचे लघु कालवे हे गाळाने बुजले आहेत. या लघु कालव्यात झाडे, झुडपे वाढल्याने पाणी प्रवाहित होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मायनर ओव्हरटॅप होतो व पाणी मन मानेल तसे वाहते. यामध्ये लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. तिवसा व शेंदूरजना बाजार भागासह दुष्काळी जिल्ह्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी हा एक प्रकारचा गुन्हा ठरत नाही काय, असा सवाल शेतकºयांचा आहे.