शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा घरफोडी, शहर असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 05:00 IST

छत्रसालनगरात चोरी, ७३ हजारांचे दागिने लंपास : गाडगेनगर ठाण्यांतर्गत छत्रसालनगरात अज्ञाताने घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने तसेच तीन हजार रुपये रोख, असा एकूण ७३ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. उर्मिला सुखदेव यादव (४०) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादी घरात झोपल्या असता, त्यांना दार उघडलेले दिसले. पंलगाखाली ठेवलेली लोखंडी पेटी त्यांना दिसली नाही.

ठळक मुद्देखंडेलवालनगरात सहा लाखांचा ऐवज लंपास, छत्रसालनगरात चोरीही

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फाॅरेस्ट कॉलनीनजीक खंडेलवाल नगरात भरदिवसा अज्ञाताने घरफोडी करून दागिन्यासह नगदी रोख असा ५ लाख ८२ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला. अक्षय कांचन बनसोड (३०) यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. सदर महिला आईच्या उपचाराकरिता बुधवारी सकाळी कुलूप लावून एका खासगी रुग्णालयात गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. आलमारीतून ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन,  अंगठी, पाटल्या, इतर दागिने व नगदी १५ हजार असा ५  लाख ८२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.  बडनेरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अधिक तपास सुरू आहे.छत्रसालनगरात चोरी, ७३ हजारांचे दागिने लंपास : गाडगेनगर ठाण्यांतर्गत छत्रसालनगरात अज्ञाताने घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने तसेच तीन हजार रुपये रोख, असा एकूण ७३ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. उर्मिला सुखदेव यादव (४०) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादी घरात झोपल्या असता, त्यांना दार उघडलेले दिसले. पंलगाखाली ठेवलेली लोखंडी पेटी त्यांना दिसली नाही. पेटीतील सोने चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात  आले. शहरात चोऱ्यांचे सत्र वाढले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.गुरुदेवनगरात तीन घरे फोडलीगुरुकुंज मोझरी : चोरांनी गुरुदेवनगर परिसरातील तीन घरांना लक्ष्य करून हजारोंचा ऐवज लांबविला. बुधवारी रात्री येथील मोहन भुसारी यांच्या घरी भाड्याने राहत असलेले अविनाश साखरवाडे हे दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरांनी त्यांच्या घरातील कपाट फोडून साहित्याची नासधूस केली. लहान मुलांचे सोन्याचे दागिने, नथ, चांदीच्या तोरड्या लंपास केल्या. लगतच्या प्रफुल्ल भीमरावजी वानखडे हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना, त्यांच्या घरातून सोन्याचे मणी, चांदीच्या तोरड्या व नगदी ३०  हजार रुपये  लंपास केले. याच परिसरात दोन दिवसांपूर्वी  दिवाळीनिमित्त स्वगावी गेलेल्या एका कुटुंबाच्या घराला चोराने लक्ष्य केले होते. काही दिवसांपूर्वी गुरुदेवनगरातील सचिन रायकर यांच्या घरून एलसीडी टीव्ही व रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. नजीकच्या अविनाश बेले यांच्या शेतातून १४ हजार रुपये किमतीचे मोटरपंप लंपास केले होते. या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. मोझरी परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. ती कर्मचाऱ्यांविना ओस पडली आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात पोलिसांकडून गस्त घातली जात होती. 

 

टॅग्स :Thiefचोर