शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत लालफितीतच

By admin | Updated: May 13, 2015 23:59 IST

पालघर पूर्व आदिवासी जंगलपट्टी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्वेस मागील सहा वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या लहान खोल्यांत सुरू आहे.

स्थायी समिती सभा : पदाधिकाऱ्यांचे अवमान केल्याप्रकरणी निषेध अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव गाव तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन केल्यानंतरही याठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदार ९ मे रोजी पोहोचले. मात्र जिल्हा परिषद सिंचन विभागाचे अधिकारी या कार्यक्रमाकडे फिरकलेच नसल्याने पदाधिकाऱ्यांचा अवमान करणाऱ्या सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय असे कृत्य करणाऱ्या या अधिकाऱ्याचा निषेधही जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आला आहे. लोहगाव येथे गावतलाव दुरुस्तीचे सुमारे ५५ लक्ष रुपयांचे काम जिल्हा परिषदेने मंजूर केले आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी ९ मे रोजी आयोजित करण्याबाबत सिंचन विभागाला लेखी स्वरुपात कळविले होते. त्यानुसार या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार वीरेंद्र जगताप व जिल्हा परिषदचे सदस्य भूमिपूजन स्थळी पोहचले. मात्र या कार्यक्रमाचे नियोजित ठरलेले धोरण बाजूला सारत सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पी.पी. पोटदुखे व अन्य अधिकारी नियोजित ठिकाणी पोहचले नाही. दरम्यान भूमिपूजन सोहळ्याला मला यायचे असल्याचा मोबाईलवर निरोप कार्यकारी अभियंता पोटदुखे यांना पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडून मिळाला असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. परंतु पालकमंत्र्यांच्या या निरोपाबरोबर साधी कल्पनाही अध्यक्ष व उपस्थित लोकप्रनिधींना देण्यात आली नाही. त्यामुळे भूमिपूजनासाठी पोहोचलेले लोकप्रतिनिधी अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे ताटकळत बसले होते. दरम्यान हा मुद्दा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करीत सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व आमदारांचा तसेच सभागृहाचा अवामान केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सभागृहात केली. यासंदर्भात सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला. याशिवाय बांधकाम विभागाचे दर्यापूर येथील उपअभियंता ठाकरे यांनी ज्या कंत्राटदारांची कामे निकृष्ट असल्याने सांगितले होते, त्याच अभियंताने काही दिवसांत ही कामे चांगली झाल्याचे प्रमाणपत्र दिले. मात्र आता देयके काढण्यास कुचराई करीत आहेत. पैसे घेऊनही अधिकारी असे कृत्य करीत असल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भातही चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.जी. भागवत यांना देण्यात आले आहे. यावेळी इतरही विषयांवर सभेत चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्वर, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, सदस्य प्रमोद वाकोडे, अभिजित ढेपे, चित्रा डहाणे, सीईओ अनिल भंडारी, डेप्युटी सीईओ के.एम. अहमद, जे.एम. आभाळे, खातेप्रुख पी.जी. भागवत, श्वेता बॅनर्जी, एस.एम: पानझाडे, चंद्रशेखर खंडारे, सी.आर. राठोड, उदय काठोडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)