शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सहकारातील स्थगित १४ संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

अमरावती : सहकारातील १४ संस्थांच्या निवडणुकीची स्थगिती शासनाने मंगळवारी उठविल्याने बुधवारपासून पुन्हा प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. कर्जमाफी, कोरोना ...

अमरावती : सहकारातील १४ संस्थांच्या निवडणुकीची स्थगिती शासनाने मंगळवारी उठविल्याने बुधवारपासून पुन्हा प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. कर्जमाफी, कोरोना संसर्ग आदी कारणांमुळे एक वर्षापासून या संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली होती.

जिल्ह्यात जानेवारी २०२० मध्ये सहकारातील १४ संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली होती. मात्र, याच सुमारास कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाल्याने या निवडणुकीला आहे त्या टप्प्यावर स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे १८ मार्च २०२० च्या आदेशान्वये १७ जून २०२० पर्यंत व १७ जूनच्या आदेशान्वये १६ सप्टेंबरपर्यंत तसेच २८ सप्टेंबरच्या आदेशान्वये ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. त्यानंतर १६ जानेवारी २०२१ चे आदेश रद्द करून ३१ मार्च २०२१ पर्यंत ही स्थगिती देण्यात आली व हे आदेशदेखील २ फेब्रुवारीला रद्द करण्यात आले. ज्या टप्प्यावर निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या, आता त्या टप्प्यापाासून पुढे प्रक्रिया राबविण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १४ सहकारी संस्थांच्या निवडणुकीला बुधवारपासून प्रारंभ होत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

जिल्ह्यातील ६४८ सहकारी संस्थांच्या निवडणुकीला १६ जानेवारीच्या आदेशाप्रमाणे ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. आता ग्रामपंचायतींची निवडणूक आटोपली. ६४८ सहकारी संस्थांमधील सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर बाजार समितीच्या निवडणुुका घेण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

बॉक्स

या संस्थांची बुधवारपासून प्रक्रिया

अभिनंदन को-ऑपरेटिव्ह बँक (अमरावती), पूर्णा अ‍ॅग्रो बायोएजन्सी सहकारी संस्था (चांदूर बाजार), हरताळा सेवा सहकारी सोसायटी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व इतर कर्मचारी सहकारी पतसंस्था (वरूड), वरूड संत्रा बागायतदार सहकारी समिती, अमरावती जिल्हा सहकारी बोर्ड, अमरावती जिल्हा ग्रामीण डाकसेवक सहकारी संस्था, हरिसाल आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, दुनी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, चाकर्दा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, नांदुरी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था,बिजुधावडी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व शिवपूर सेवा सहकारी संस्था (चांदूर बाजार)

कोट

संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात प्राधिकरणाला प्रस्ताव पाठविण्यात येईल व त्यांचा मान्यतेनंतर लगेच निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. या संस्थांची अंतिम मतदार यादी झाली आहे.

- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)