शहरं
Join us  
Trending Stories
1
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
2
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
3
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
4
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
5
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
6
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
7
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
8
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
9
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
10
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
11
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
12
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
13
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
14
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
15
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
16
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
17
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
18
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
19
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
20
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आईपाठोपाठ मुलगाही स्वाईन फ्लूने दगावला

By admin | Updated: February 17, 2015 00:52 IST

अमरावती : स्थानिक एकनाथपुरम येथील रहिवासी शारदादेवी चौधरी यांचा पाचच

अमरावती : स्थानिक एकनाथपुरम येथील रहिवासी शारदादेवी चौधरी यांचा पाचच दिवसांपूर्वी स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्यांच्या पाठोपाठ रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्यांचा ३० वर्षीय तरुण मुलगा राहुलदेखील स्वाईन फ्लूने दगावल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराने चौघांचा बळी घेतला आहे. एकनाथपुरम येथील शारदादेवी चौधरी यांच्यावर काही दिवसांपासून नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. त्यांना भेटण्याकरिता त्यांचे काही नातेवाईक नागपूर येथील रुग्णालयात गेले होते. मुलगा राहुलसुध्दा आईच्या भेटीवाचून राहू शकला नाही. त्यालाही या जीवघेण्या आजाराने घेरले आणि आईपाठोपाठ राहुललादेखील या आजाराने कवेत घेतले. कुटुंबीयांवर दु:खाचा पहाड कोसळला. राहुल हा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे परिसरासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे.राहुलला उलट्यांचा त्रास सुरु झाल्यामुळे २६ जानेवारी रोजी त्यालाही नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई व मुलगा दोघांवरही तेथेच उपचार सुरु होते. राहुलच्या छातीत गंभीर वेदना होत होत्या. तपासणीअंती स्वाईन फ्लूची लक्षणे आढळून आली. राहुलच्या घशातील द्रव तपासणी केल्यावर डॉक्टरांनी स्वाईन फ्लूची पुष्टी केली. उपचार सुरु असतानाच त्याची प्रकृती अधिकाधिक गंभीर होत गेली. आईचीही प्रकृती गंभीर होतीच. डॉक्टरांनी दोघांनाही वाचविण्याचे अथक प्रयत्न केले. मात्र आई १० फ्रेब्रुवारीला जग सोडून गेली. नातेवाईकांनी शारदादेवीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले. रविवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी राहुलची प्रकृती बिघडली असता नातेवाईक त्याला मुंबई येथे हलविण्याच्या विचारात होते. मात्र सायंकाळी ५ वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह अमरावतीला आणण्यात आला. स्वाईन फ्लूची दक्षता घेत नागरिकांनी सोमवारी राहुलच्या मृतदेहावर हिन्दू स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले. मायलेकाच्या पाठोपाठ मृत्यूने अख्खे शहर हळहळले. (प्रतिनिधी)