शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

जलशिवार योजना ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान

By admin | Updated: August 9, 2015 23:58 IST

अत्यंत कमी कालावधीत परंतु योग्य नियोजन साधून धारणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने डझनावर सिमेंट बंधारे बांधून नाल्यालगतच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे.

बंधाऱ्यांनी फुलविले हास्य : धारणी तालुक्यात होणार हरितक्रांतीश्यामकांत पाण्डेय धारणीअत्यंत कमी कालावधीत परंतु योग्य नियोजन साधून धारणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने डझनावर सिमेंट बंधारे बांधून नाल्यालगतच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे. येत्या रबी हंगामात सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने आता आपली मागील चार वर्षांपासून होत असलेल्या नापिकीवर मलम लावले जाण्याचा आनंद मेळघाटातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर महिन्यात ‘जलशिवार योजना’ आणली. त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी जून महिना आला. या पावसाळ्यापूर्वी जलशिवाराच्या माध्यमातून नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधण्याचे आवाहान जिल्हाधिकाऱ्यांसमोर होते. त्यांनी वारंवार तातडीच्या बैठका बोेलावून सर्व विभागांशी सांगड घालून सिमेंट नाला बंधारा, तलावातील गाळ उपसणे, विहिरींचे बांधकाम करणे ्अशी कामे हाती घेऊन ते जून महिन्यापर्यंत पूर्णत्वास नेण्याचे आवाहन केले.विशेष म्हणजे, जवळपास सर्वच विभागाने या आवाहनाला स्वीकारुन आपल्या परिने पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे परिणामही दिसू व जाणवू लागले आहेत. कृषी विभागाने पूर्वीच नाला सुरळीकरणासाठी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली होती. त्या नाल्यांवर सीएनबी सिमेंट नाला बांधाची निर्मितीसुध्दा केली. आता हे नाले तुडूंब भरले असून याचा लाभ लगतच्या शेतकऱ्यांना रबी हंगामात होणार आहे. कृषी अधिकारी पी.सी. दीक्षित यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी अरुण बेठेकर, सी.टी. लिंगोट आणि अ‍े.एम. बदखल यांनी मिळून १२ सीएनबी बंधारे तयार केले आहेत. यामध्ये धारणी तालुक्यातील बैरागड -३, चुरिया -३, उतावली -२, कुसुमकोट-२, बारु १ व पाडीदम -१ यांचा समावेश आहे. या कामामुळे सुरु करण्यात आलेल्या जलशिवार योजेनची भविष्यात चांगली वाटचाल असणार, असा आशावाद मेळघाटातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे मेळघाटातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.