शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

वधू-वरांच्या वयाचा दाखल तपासल्यावरच मंगल कार्यालयाचे बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण समिती, चाईल्‍ड लाईन, पुनर्वसन व बालकल्याण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. समितीच्या अध्यक्ष वंदना चौधरी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डवले, चाईल्डलाईन समन्वयक फाल्गुन पालकर आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची ताकीद

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  बालविवाह प्रथा समूळ नष्ट होण्यासाठी यंत्रणेने अधिक काटेकोर होण्याची गरज आहे. यासाठी वर व वधूच्या वयाचा दाखला तपासल्याशिवाय मंगल कार्यालय, कॅटरर्स, पंडित, बिछायत केंद्र, लग्नपत्रिका छापणारे छापखाने आदी विवाहासंबंधी सेवा देऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी दिले.महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण समिती, चाईल्‍ड लाईन, पुनर्वसन व बालकल्याण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. समितीच्या अध्यक्ष वंदना चौधरी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डवले, चाईल्डलाईन समन्वयक फाल्गुन पालकर आदी उपस्थित होते.विवाहासंबंधी सेवा देणाऱ्यांना वयाचा दाखला तपासल्याशिवाय सेवा न देण्याची अंमलबजावणी करण्याबाबत सुस्पष्ट आदेश देण्यात यावेत. त्यासंबंधी संबंधित यंत्रणेने कार्यवाही करावी. शासकीय बालगृह भाड्याच्या इमारतीमधून शासकीय इमारतीमध्ये स्थानांतरित करण्याबाबत प्रयत्न व्हावेत. चाईल्डलाईन हेल्पलाईन १०९८ मधून बालकांसंबंधीच्या तक्रारींचे निवारण होत आहे. या सेवेत महिला घटकाचाही समावेश व्हावा. महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा अधिकाधिक गरजूंना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हा बालसंरक्षण कक्षातर्फे यावर्षी मार्चपासून आतापर्यंत ११ बालविवाह थांबविण्यात आले, अशी माहिती अजय डवले यांनी दिली. बाल कल्याण समितीकडे प्राप्त सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आल्याचे वंदना चौधरी यांनी सांगितले. 

मुलींचे निरीक्षणगृह, बालगृहाची पाहणीजिल्हाधिकारी नवाल यांनी मंगळवारी देसाई लेआऊट येथील शासकीय मुलींचे निरीक्षणगृह व बालगृहाला भेट देऊन पाहणी करण्यात आली. महिला व बाल विकास अधिकारी भडांगे, परिविक्षा अधिकारी सुभाष अवचार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निरीक्षणगृह व बालगृहातील बालकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निरीक्षणगृह व बालगृहासाठी शासकीय इमारत मिळण्याबाबत पाठपुरावा करण्याबाबत निर्देश त्यांनी दिले.

 

टॅग्स :marriageलग्नcollectorजिल्हाधिकारी