शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावात स्किल इंडियाचा लोगो वापरून बोगस भरती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 11:42 IST

Amravati : पोलिसांकडून दोघांची चौकशी, उगाचच झंझट नको म्हणून फिर्यादीने परत घेतली लेखी तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क अंजनगाव सुर्जी : स्थानिक श्रीनाथ विद्यालयात सोमवारी दुपारी सुरक्षा कर्मचारी व सुपरवायझर भरतीच्या नावाखाली बोलाविलेल्या शेकडो युवकांकडून शंभर रुपये प्रवेश शुल्क वसूल करणाऱ्या नदीम आणि शिवनाथ या दोघांची स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. मात्र, या प्रकरणाची पोलिसांत लेखी तक्रार करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्याने ती तक्रार मागे घेतल्याने वादावर पडदा पडला.

तक्रारीनुसार ९ ते १२ सप्टेंबरदरम्यान कॅपिटल सिक्युरिटी संकेतस्थळाच्या नावाने कोणताही पत्ता न देता सुरक्षा जवानांच्या भरतीची जाहिरात स्थानिक मीडियात झळकली. भारत कौशल्य विकास योजना असे नाव या जाहिराती दिली. भरतीत सहभागी होणाऱ्या तरुण, तरुणींना नाशिक पोलिस दलात नोकरी देण्याची बतावणी करण्यात आली. 

याबाबत प्रशासनाला कुठलीही माहिती नाही. आयोजक बेरोजगार युवकांकडून गेटवरच शंभर रुपये व नोंदणी फी साडेतीनशे रुपये वसूल करीत होते आणि त्यांना शिस्तीसाठी छडीचे फटकेसुद्धा मारीत होते. आलेल्या बहुतांश युवकांना या आयोजकांनी घेतलेली रक्कम तक्रारीनंतर पोलिस स्टेशन आवारात परत केली. यावरून ही भरतीप्रक्रिया केवळ बनाव असून, युवकांकडून पैसे उकळण्यासाठी राबविण्याचा आरोप करण्यात आला. मात्र त्यानंतर तक्रारकर्ता पदाधिकारी बॅकफूटवर आल्याने मुसळ केरात गेले. 

टॅग्स :Amravatiअमरावतीfraudधोकेबाजी