लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चित्रा चौकातील एका घाण पाण्याच्या खड्ड्यात सोमवारी सकाळी फर्निचर व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली. प्रवीण परमार (३५) असे मृताचे नाव आहे. या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.चित्रा चौकातील एका खड्ड्यात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती रविवारी सकाळी कोतवाली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चाटे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढून ओळख पटविणे सुरू केले. त्यावेळी त्याचे नाव प्रवीण परमार असल्याचे कळले. त्याचा लोहा बाजारजवळ फर्निचर व्यवसाय आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. घटनेच्या माहितीवरून मृताच्या नातेवाइकांनी पोलीस ठाणे गाठले. या घटनेत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दारू पिऊन तो खड्ड्यात पडला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.चित्रा चौकातील खड्ड्यात मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहावर जखमा नाहीत. त्याच्या कुटुंबीयांनीही कोणावर संशय व्यक्त केला नाही. आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.- शिवाजी बचाटे, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे.
फर्निचर व्यावसायिकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:25 IST
चित्रा चौकातील एका घाण पाण्याच्या खड्ड्यात सोमवारी सकाळी फर्निचर व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली. प्रवीण परमार (३५) असे मृताचे नाव आहे. या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
फर्निचर व्यावसायिकाचा मृतदेह आढळला
ठळक मुद्देघातपाताचा संशय : आकस्मिक मृत्यूची नोंद