शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

अमरावतीत भाजपचे ‘वेट अँड वॉच’, काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 8:57 PM

भाजपमध्ये अंतर्गत लाथाड्या असल्या तरी श्रेष्ठींनी मात्र इच्छुकांना सबुरीचा सल्ला देत ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

अमरावती : मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी काँग्रेसमध्ये दवाबतंत्राचा वापर, तर दुसरीकडे प्रतिष्ठेचा मुद्दा करून मतदारसंघ ओढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे होत आहे. या घडामोडी घडत असतानाच भाजपमध्ये अंतर्गत लाथाड्या असल्या तरी श्रेष्ठींनी मात्र इच्छुकांना सबुरीचा सल्ला देत ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. अन्य पक्षांचा आढावा घेता, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम अन् बीएसपीमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे ताजे चित्र आहे.

प्रदेशस्तरावर फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युुल्यात जागा वाटपाचे ठरले, असे आघाडीचे धुरीण सांगत आहेत. यामध्ये अमरावती मतदारसंघ नेमका कोणाच्या वाट्याला, याचे सुतोवाच मात्र अधिकृतपणे अद्यापही झालेले नाही. काँग्रेसचे नेते, अमरावतीचे माजी आमदार व या दशकात काँग्रेसचे उमेदवार असलेले रावसाहेब शेखावत यांची अलीकडची अलिप्तता व वक्तव्य या पार्श्वभूमीवर ठळकपणे अधोरेखित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार या अर्थाने बडनेराच्या माजी आमदार सुलभा खोडके यांच्या अमरावती मतदारसंघात सुरू असलेल्या गृहभेटी अनेकांच्या भुवया उंचाविणाऱ्या ठरल्या आहेत. घरवापसी झाल्यानंतर संजय खोडके यांच्या चालीने भाजप गोटात खळबळ उडालेली आहे, हे निश्चित.

भाजपमध्ये विद्यमान आमदार सुनील देशमुख यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर उघडपणे विरोध केला जात आहे. माजी महापौर व माजी प्रदेशाध्यक्ष किरण महल्ले यांच्या इच्छेला आता धुमारे फुटले आहेत. दुसरे डॉक्टर हेमंत वसू यांनीही अमरावती मतदारसंघात दावा केला आहे. भाजपच्या सहा पदाधिकाऱ्यांनी श्रेष्ठींसमोर प्रबळ दावेदारी केली असल्याने पक्षासमोर निश्चितच पेचप्रसंग उभा ठाकला आहे. शिवसेनेची अमरावतीमध्ये तुलनेने शक्ती कमी असली तरी बडनेरा मतदारसंघ जमत नसेल, तर अमरावतीचा पर्याय अनेकांनी सेनाभवनात सादर केला आहे.

वंचित बहुजन आघाडी, एमआयएम व बसपादेखील दखलपात्र आहे. बसपाला मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे. वंचित आघाडी व एमआयएममध्येदेखील मुस्लिम उमेदवार देण्यावर भर असल्याने या व्होटबँकेवर मदार असणाºया उमेदवारांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

२०१४ मध्ये राकाँला मिळालेले मतदान हा कळीचा मुद्दाकाही स्थित्यंतर वगळता काँग्रेसचा परंपरागत गड असलेला अमरावती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याच्या नुसत्या वार्तेनेही स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे राजीनामे सादर केले. त्यामुळे अमरावती मतदारसंघ अगदी सहजपणे मित्रपक्षाला सोडणे सोपे नसल्याची बाब एव्हाना श्रेष्ठींच्याही लक्षात आलेली आहे. विशेष म्हणजे, सन २०१४ च्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले असताना राकाँच्या उमेदवाराला मिळालेली १०३० मते हा कळीचा मुद्दा या धुरंधरांनी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनात आणला आहे.

टॅग्स :BJPभाजपाAmravatiअमरावती