ज्ञानगंगा अभयारण्यात पहिल्यांदा आढळला रानगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 01:23 PM2020-12-08T13:23:37+5:302020-12-08T13:23:55+5:30

Amravati news wildlife ज्ञानगंगा अभयारण्यात पहिल्यांदा रानगवा (बायसन) आढळून आला आहे. रविवार, ६ डिसेंबर रोजी बुलडाणा वन्यजीव परिक्षेत्रांतर्गत देव्हार बीटमध्ये गस्तीवरील वनकर्मचाऱ्यांनी ही नोंद घेतली.

Bisen was first time found in the Dnyanganga Sanctuary | ज्ञानगंगा अभयारण्यात पहिल्यांदा आढळला रानगवा

ज्ञानगंगा अभयारण्यात पहिल्यांदा आढळला रानगवा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : ज्ञानगंगा अभयारण्यात पहिल्यांदा रानगवा (बायसन) आढळून आला आहे. रविवार, ६ डिसेंबर रोजी बुलडाणा वन्यजीव परिक्षेत्रांतर्गत देव्हार बीटमध्ये गस्तीवरील वनकर्मचाऱ्यांनी ही नोंद घेतली.

हा रानगवा जवळपास शंभर किलोमीटरचा प्रवास करीत अंबाबरवा अभयारण्यातून ज्ञानगंगा अभयारण्यात पोहचल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या रागव्याच्या आगमनाने ज्ञानगंगातील वन्यजीवांच्या वैभवात भर पडली असून, पर्यटकांना वन व वन्यजीवांनी समृद्ध असे नवे पर्यटनक्षेत्र उपलब्ध होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा-खामगाव राज्य मार्गास लागून असलेले २०५ चौरस किलोमीटर क्षेत्रातील हे ज्ञानगंगा अभयारण्य १९९७ ला अस्तित्वात आले. यात बिबट, अस्वल, नीलगाय, सांबर, चितळ, चिंकारा, भेडकीसह अन्य वन्यजीव सुरुवातीपासून अस्तित्वात आहेत. बिबट ही ज्ञानगंगाची ओळख पट्टेवाला वाघ आणि रानगवाचे वास्तव्य त्या क्षेत्रात नव्हते. दरम्यान यवतमाळ जिल्यातील टिपेश्वर अभयारण्यातून प्रवास करीत टी-वन सी - वन नामक तीन वर्षीय पट्टेदार वाघ ३० नोव्हेंबर २०१९ ला याच ज्ञानगंगा अभयान्यात दाखल झाला. या पट्टेदार वाघाच्या आगमनाने ज्ञानगंगा अभयारण्य अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आले.

हा वाघ आता ज्ञानगंगात स्थिरावला असून, ज्ञानगंगाला त्याने नवीन ओळख दिली असतानाच ६ डिसेंबर २०२० रोजी रानगवा आढळून आल्याने परत एकदा ज्ञानगंगा चर्चेत आले आहे. ज्ञानगंगात ९ ते १० फूट उंचीचे मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. वाघाच्या आगमनानंतर एका वर्षातच रानगवा ही ज्ञानगंगात पोहचला आहे. हा रानगवा नेमका कुठून आला. याचा शोध घेत त्याच्या भ्रमणमार्ग वनकर्मचारी तपासणार आहेत. त्याच्या हालचालीवर ते लक्ष ठेवून आहेत. सुरक्षित जंगल, चारा-पाण्याची मुबलकता बघण्याकरिताच हा रानगवा ज्ञानगंगात पोहचला असावा त्यापाठोपाठ रानगव्यांचा कळपही दाखल होऊ शकतो. असे मत वन्यजीव अभ्यासकांकडून वर्तविले जात आहे.

ज्ञानगंगा अभयारण्यात ६ डिसेंबर २०२० रोजी रानगवा आढळून आला. ज्ञानगंगाच्या इतिहासातील ही पहिलीच नोंद आहे.

- विशाल बनसोड, मानद वन्यजीवरक्षक, अमरावती

Web Title: Bisen was first time found in the Dnyanganga Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.