हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:01:01+5:30

या घटनेच्या माहितीवरून मोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहास इर्विन रुग्णालयात आणले. तेथे सुरेखाच्या माहेरची मंडळीही पोहोचली. त्यावेळी तेथे दिनेश तट्टेच्या कुटुंबातील कुणाही उपस्थित नव्हते. त्यामुळे माहेरच्यांना शंका आली. या घटनेच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी आकस्मीक मृत्यू नोंद केली.

Birthdate to husband who commits suicide by murder | हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पतीस जन्मठेप

हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पतीस जन्मठेप

Next
ठळक मुद्देन्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : मोर्शी येथील सन २०१२ चे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गळा आवळून पत्नीची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव करणाºया पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दिनेश देवीदास तट्टे (४६,रा. राधाकृष्ण कॉलनी, मोर्शी) असे शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालय (५) निखिल मेहता यांच्या न्यायालयाने बुधवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सहायक सरकारी अभियोक्ता एम.एस. भागवत यांचा युक्तिवाद प्रभावी ठरला.
विधी सूत्रानुसार, दिनेश तट्टेचे २००४ मध्ये सुरेखासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन अपत्ये झाली. त्यांच्या लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाले होते. तत्पूर्वी सहा वर्षांपासून दिनेश तट्टे हा सुरेखाला माहेरवरून पन्नास हजार रुपये आणण्याचा तगादा लावत होता, तसेच तिच्याजवळील सोन्याचे दागिने मागूून तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागला. १३ जुलै २०१२ रोजी मद्यधुंद अवस्थेत दिनेशने पत्नीला सुरेखाला पुन्हा मारठोक केली, तिने भावाला फोन करून पती दिनेश जबरदस्तीने दागिने मागत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर १४ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास पती मारहाण करीत असल्याचे सुरेखाने बहिण पुष्पा गजानन वानखडेला सांगितले होते. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता दिनेशने सासºयाला फोन करून सुरेखाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली.
या घटनेच्या माहितीवरून मोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहास इर्विन रुग्णालयात आणले. तेथे सुरेखाच्या माहेरची मंडळीही पोहोचली. त्यावेळी तेथे दिनेश तट्टेच्या कुटुंबातील कुणाही उपस्थित नव्हते. त्यामुळे माहेरच्यांना शंका आली. या घटनेच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी आकस्मीक मृत्यू नोंद केली.
प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आरोपी दिनेश देवीदास तट्टे, सासरे देवीदास अमृतराव तट्टे (७३) व सासू पुष्पा तट्टे (६३) यांचेविरुद्ध भादंविच्या कलम ३०६, ४९८(अ), ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. शवविच्छेदन अहवालातून सुरेखाची गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मोर्शी पोलिसांनी या गुन्ह्यात भादंविची कलम ३०२ वाढविली. मोर्शी ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व्ही.टी.पाटील यांनी या घटनेचा प्राथमिक तपास केला. त्यानंतर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम.जी.कांबळे यांनी तपासकार्य पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
जिल्हा व सत्र न्यायालय (५) निखिल मेहता यांच्या न्यायालयात सहायक सरकारी अभियोक्ता मंगेश भागवत यांनी सहा साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर आरोपी दिनेश देविदास तट्टे याचा दोष सिद्ध झाला.
न्यायालयाने दिनेश तट्टेला जन्मठेपेची शिक्षा, पाच हजारांचा दंड व दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. देवीदास तट्टे व पुष्पा तट्टे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात पोलीस विभागाकडून पैरवी अधिकारी म्हणून गुल्हाने यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Birthdate to husband who commits suicide by murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग