शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:40 PM

खापरातून अंधाराच्या घरी सूर्य वाटणारे, स्वच्छतेचे महान पुजारी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा यांच्या ६२ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन बाबांच्या समाधीस्थळी १४ ते २१ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविविध सामाजिक कार्यक्रम : प्रबोधनकारांची राहणार मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खापरातून अंधाराच्या घरी सूर्य वाटणारे, स्वच्छतेचे महान पुजारी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा यांच्या ६२ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन बाबांच्या समाधीस्थळी १४ ते २१ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे.या महोत्सवात आठवडाभर विविध कार्यक्रम, व्याख्यानमाला, पुरस्कार वितरणासह प्रबोधनकार मंडळीची मांदियाळी राहणार आहे. महोत्सवातील श्रीमद् भागवत कथेचे पठण देवी वैभवश्रीजी यांच्या वाणीतून होणार आहे. बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.शहरातील श्री संत गाडगेबाबंच्या समाधीस्थळी पुण्यतिथी महोत्सवाचा प्रांरभ १४ डिसेंबरला होईल. सकाळी ९.३० वाजता महापौर संजय नरवने यांच्या हस्ते बाबांच्या समाधीचे पूजन व पुण्यातिथी महोत्सवाचे शुभारंभ, होईल. सप्ताहभर सकाळी १०.३० ते १२.३० व दुपारी २ ते ४ श्रीमद् भागवत कथा, १२.३० ते १ वाजेपर्यंत अंध अंपगांना अन्नदान, वस्त्रदान रात्री ८ ते ८.३० निकिता पुरी यांचे गीत रामायाण, रात्री ९ वाजता हभप नारायण महाराज पडोळे यांचे राष्ट्रीय कीर्तन, १५ डिसेंबरला रात्री ९ वाजता दीपक भांडेकर यांचे सप्तखंजेरी प्रबोधन, १६ डिसेंबरला रात्री ८ ते ९ बालकीर्तनकार जान्हवी घुमे (नागपूर) यांचे राष्ट्रीय कीर्तन, रात्री ९ वाजता युवा समाजप्रबोधनकार आकाश महाराज टाले नागपूर यांचे सप्तखंजेरी प्रबोधन, १७ डिसेंबरला रात्री ८ ते ८.३० ऐश्वर्या खंडारे यांचे कीर्तन, रात्री ९ ते १०.३० सप्तखंजेरीवादक इंजि.पवन महाराज दवंडे यांचा समाजप्रबोधन कार्यक्रम, १८ डिसेंबरला रात्री ८ ते ८.३० डॉ.पोर्णिमा दिवसे यांचे भक्तीरंग, रात्री ८.३० ते १०.३० उद्धवराव गाडेकर महाराजांचे राष्ट्रीय कीर्तन होईल.समारोपीय २१ डिसेंबरला सकाळी पालखी मिरवणूक व दु.१२ वाजता तुळशीदास महाराज धर्माळकर यांचे काल्याचे कीर्तन. नंतर महाप्रसाद वितरण होईल, असे व्यवस्थापक प्रकाश महात्मे, गजानन देशमुख, मंगेश वानखडे यांनी कळविले आहे.