शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता दिवसाच्या कार्यक्रमात वन्यप्रेमींकडून निषेध

By admin | Updated: May 23, 2016 00:15 IST

छत्री तलाव रोडवरील सामाजिक वनिकरणाचे जैवविविधता उद्यान वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी अडथळा निर्माण करीत असल्याने उद्यानाचे तारेचे कुंपण काढण्यात यावे,

वन विभागात खळबळ : तारेचे कुंपण काढण्याची मागणी अमरावती : छत्री तलाव रोडवरील सामाजिक वनिकरणाचे जैवविविधता उद्यान वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी अडथळा निर्माण करीत असल्याने उद्यानाचे तारेचे कुंपण काढण्यात यावे, अशी मागणी घेऊन रविवारी मधूबन वन्यजीव संरक्षण संस्थेचे नीलेश कंचनपुरे यांनी वनविभाग कार्यालयातील जैवविविधता दिनानिमित्तच्या कार्यक्रमात निषेध नोंदविला. त्यामुळे काही वेळाकरिता कार्यक्रमात विघ्न आले होते. गर्ल्स हायस्कूलजवळ असणाऱ्या वन विभागाच्या कार्यालयात रविवारी सकाळी जैवविविधता दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात गोंधळअमरावती : या कार्यक्रमात जिल्हाधिकारी किरण गित्ते, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसरंक्षक दिनेश त्यागी, उपवनसरंक्षक निनु सोमराज, राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य किशोर रीठे, वक्ते जी.एन.वानखेडे, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर, जिल्हा जैवविविधता समितीचे सदस्य गजानन वाघ, मत्स व्यवसाय अधिकारी सु.ना.सुखदेवे, वनराईचे अध्यक्ष मधू धारड, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी जैवविविधतेवर प्रकाश टाकीत, ती कशी टिकूव शकतो. यावर मागदर्शन केले. दरम्यान वन्यप्रेमी निलेश कंचनपुरे यांने कार्यक्रमातील मंचावर प्रवेश करून निषेध नोंदविणारे भाष्य केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कंचनपुरेला आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठावर बोलाविले. कंचनपुरेने उद्यानाचा मुद्दा मांडून वन्यप्राण्याबद्दल आत्मीयता दाखवून उद्यानाचे तारेची कुंपण काढण्याची मागणी वनविभागाकडे केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कंचनपुरेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.व्ही. पडगव्हाणकर, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर, मधू घारड यांच्यासह काही अधिकाऱ्यांना छत्री तलावाजवळील उद्यानाची पाहणी करण्याकरीता पाठविले होते. त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरु करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत वऱ्हेकर तर आभार उपवनसरंक्षक निनु सोमराज यांनी मांनले. (प्रतिनिधी)