शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

नुकसान मोठे, मदत तोकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 6:00 AM

दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. ऐन हंगामात सोयाबीनचे मातेरे झाले. गंजीतील सोयाबीनला बिजांकुर फुटले, फुटलेला कापूस ओला झाला. कापसाच्या सरकीतून बिजांकूर निघाले. कापसाची प्रतवारी खराब झाली. बोंडे सडायला लागली, ज्वारी, मक्याची कणसे सडली, कणसातून बिजांकुर निघाले. ऐन हंगामात दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले.

ठळक मुद्देउद्ध्वस्त खरीप : तीन हजार रुपये एकर निकषाने जिरायती क्षेत्राला शासन मदत

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने तीन लाख ७५ हजार ३९८ शेतकऱ्यांची तीन लाख ७३ हजार ५५० हेक्टरमधील शेती व फळपिके उद्वस्त झालीत. या बाधित जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी आठ हजार रुपयांप्रमाणे २९४ कोटी ४१ लाख ५२ हजार व बागायती पिकांसाठी १६ हजार रुपये हेक्टरप्रमाणे ८१ लाख ३८ हजार १६० रुपयांची शासन मदत मिळणार आहे. ज्या प्रमाणात खरिपाचे नुकसान झाले, त्या तुलनेत मिळणारी मदत ही तोकडी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.जिल्ह्यात २ लाख १२ हजार ३२९ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल आहे. या क्षेत्राला आता हेक्टरी आठ हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेत १६९ कोटी ८६ लाख ३२ हजार, अशी शासन मदत मिळणार आहे. ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे ६८०० ही मदत १४४ कोटी ३८ लाख ३७ हजार २०० याप्रमाणे मिळणार होती. यंदा सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी किमान १५ क्विंटल असल्याचा कृषी विभागाचा नजरअंदाज अहवाल आहे. त्यामुळे आधारभूत किंमत ३७१० रुपये प्रतिक्विंटल गृहीत धरता जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांचे ११८१ कोटी ६१ लाख ८ हजारांचे नुकसान झाले आहे.दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. ऐन हंगामात सोयाबीनचे मातेरे झाले. गंजीतील सोयाबीनला बिजांकुर फुटले, फुटलेला कापूस ओला झाला. कापसाच्या सरकीतून बिजांकूर निघाले. कापसाची प्रतवारी खराब झाली. बोंडे सडायला लागली, ज्वारी, मक्याची कणसे सडली, कणसातून बिजांकुर निघाले. ऐन हंगामात दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले. जिल्ह्यात एकूण शेतकरीसंख्येच्या ९४ टक्के म्हणजेच तीन लाख ७५ हजार ३९८ शेतकºयांचा ७८ टक्के खरीप हंगामाचा म्हणजेच तीन लाख ७३ हजार ५५० हेक्टरमधील पिके मातीमोल झाली आहे.कपाशीला मिळणार १०८.३७ कोटीअवकाळी पावसाने जिल्ह्यातील एक लाख ३५ हजार ४७२ हेक्टर क्षेत्रातील कपाशीचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. आठ हजार रुपये हेक्टर या शासन निकषाप्रमाणे १०८ कोटी ३७ लाख ७६ हजारांची मदत देय राहील. कपाशीची हेक्टरी किमान १५ क्विंटल सरासरी उत्पादकता गृहीत धरल्यास आधारभूत किंमत ५५५० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे ११२८ कोटी ८० लाख ४४ हजारांचे नुकसान झालेले आहे. या तुलनेत शासननिकषाद्वारा तुटपुंजी मदत मिळणार आहे.सरसकट शेतकºयांना हवी शासन मदतनैसर्गिक आपत्तीचे नुकसान हे सरसकट असल्याने शासनाद्वारा दिली जाणारी मदतदेखील सरसकट शेतकऱ्यांना मिळायला हवी व हा आवाज लोकप्रतिनिधींनी बुलंद करावयास हवा. जिल्ह्यात बहुतांश सात-बारे हे संयुक्तिक आहेत. त्यामुळे एका कुटुंबात तीन ते चार परिवाराचे नुकसान झाल्यास शासन मदत ही एकाच परिवाराला मिळते. दोन हेक्टरच्या मर्यादेमुळे बहुतांश शेतकरी परिवाराचे नुकसान यामध्ये होत असल्याचे जिल्ह्याचे वास्तव आहे.पीकविमा मिळणार, पण केव्हा?जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग नोंदविलेला आहे. त्या तुलनेत अवकाळीचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत नुकसान सूचना अर्ज केवळ एक लाख शेतकऱ्यांनी संबंधित यंत्रणेकडे सादर केले आहेत. शेतकऱ्यांचा प्रीमियम विम्यात सहभागी होताना घेतला. आता दोन दिवसांपूर्वी शासन हिस्स्याची रक्कम कंपनीकडे जमा करण्यात आलेली असल्याने विमा कंपन्यांदारा शेतकऱ्यांना आर्थिक संकटाच्या काळात भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.बागायती पिकांना मिळणार ८१ लाखया नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील बागायती पिकांचे ४५२ हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. त्यांना १८ हजार रुपये हेक्टरप्रमाणे ८१ लाख ३८ हजार १६० रुपयांची मदत मिळणार आहे. यापूर्वी ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे ६१ लाखांची मदत देय होती. त्यामुळे शासनाद्वारा केवळ वाढीव मदतीचा बागूलबुआ उभा केल्या जात आहे. यामध्ये संत्रा या फळपिकांच्या मदतीचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही, त्यामुळे बागायती पिकांमध्ये गृहीत धरल्या जाणारा असल्याने संत्रा उत्पादकांवर हा अन्याय असल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती