शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भोंदू पवन महाराजने खरेदी केला लाखोंचा फ्लॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:54 IST

शासकीय वसाहतीतील मोफतच्या घरात राहून भोंदूबाबा पवन महाराजने लाखोंची माया जमवली कशी? सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणारा लाखो रुपयांचा फ्लॅट पवन महाराजने बुक केल्याचे दस्तऐवज पोलिसांना त्याच्या घरातील आलमारीत आढळून आले. त्यामुळे पवन महाराजने अंधश्रद्धाळू श्रीमंतांकडून मिळालेल्या पैशातून लाखोंची माया गोळा केल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देआलमारीत आढळले दस्तऐवज : अंधश्रद्धाळूंकडून जमवली माया

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासकीय वसाहतीतील मोफतच्या घरात राहून भोंदूबाबा पवन महाराजने लाखोंची माया जमवली कशी? सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणारा लाखो रुपयांचा फ्लॅट पवन महाराजने बुक केल्याचे दस्तऐवज पोलिसांना त्याच्या घरातील आलमारीत आढळून आले. त्यामुळे पवन महाराजने अंधश्रद्धाळू श्रीमंतांकडून मिळालेल्या पैशातून लाखोंची माया गोळा केल्याचे दिसून येत आहे.गाडगेनगर पोलिसांनी पवन महाराजच्या घरातील आलमारी उघडली असता, त्यात 'तंत्रसिद्धी रहस्य भाग ५'चे पुस्तक आढळले. त्यामुळे यावरून पवन महाराज भोळाबाबड्या भक्तांमध्ये अंधश्रद्धा पसरवून पैसे उकळत असल्याचे निदर्शनास येत आहे. पोलिसांना आलमारीत महागड्या साड्या व रहाटगाव परिसरात फ्लॅट बुकिंगचे दस्तऐवज आढळले. त्या सदनिकेची किंमत पवनच्या शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून ४० लाखांच्या घरात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय वसाहतीत पवन महाराज बेकायदेशीर राहात आहे. सर्वसामान्याप्रमाणे पवनची आर्थिक परिस्थिती आहे. मात्र, भोंदूगिरी सुरू केल्यापासून पवनचे संबंध नतमस्तक होणाºया लब्धप्रतिष्ठितांशी जुळल्याने त्याचे दिवसही पालटले.महागड्या पूजा स्वस्त दरातधार्मिकतेच्याआड पवन महाराज तंत्रमंत्र विद्येतून नागरिकांची दिशाभूल करीत आहे. भक्तगण पूजा-अर्चा पवन महाराजाच्या हाताने करायचे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे जाऊन अनेक भाविक विधीवत पूजेसाठी लाखो रुपये खर्च करतात. तीच पूजा पवन महाराज १५ ते २० हजारांत करून द्यायचा. त्या भक्तासोबत त्र्यंबकेश्वरला जाऊन विधिवत पूजा करीत होता.पवन बीएससीचा विद्यार्थीपवन घोंगडे हा रविनगर चौकातील एका नामांकित महाविद्यालयात बी.एससी भाग १ मध्ये शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिक्षण व लिखाणात अत्यंत हुशार असणाºया पवन महाराजाने धार्मिक विधिवत पूजा-अर्चा करण्याचे ज्ञान अवगत केले. तंज्ञसिद्धी रहस्य पुस्तकाच्या अभ्यासातून तंत्रमंत्र शिकला. भोंदूगिरी करीत तो या व्यवसायात उतरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पवन महाराजाच्या आलमारीत रहाटगाव परिसरात फ्लॅट बुक केल्याचे दस्तऐवज आढळले. मात्र, त्याच्या गुन्ह्याशी याचा संबंध येत नाही. तो नेमका कुठे आहे, याची माहिती घेत आहे.- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर