आधारभूत खरेदी योजनेत मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:12 AM2021-01-18T04:12:30+5:302021-01-18T04:12:30+5:30

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा, केंद्रीय सार्वजनिक वितरण राज्यमंत्र्यांशी चर्चा अमरावती : आधारभूत खरेदी योजनेपासून मेळघाटातील मका, ज्वारी उत्पादक शेतकरी बांधव वंचित ...

Basic procurement resumes corn, sorghum procurement | आधारभूत खरेदी योजनेत मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू

आधारभूत खरेदी योजनेत मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू

Next

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा, केंद्रीय सार्वजनिक वितरण राज्यमंत्र्यांशी चर्चा

अमरावती : आधारभूत खरेदी योजनेपासून मेळघाटातील मका, ज्वारी उत्पादक शेतकरी बांधव वंचित राहू नयेत म्हणून खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र शासनाला केली होती. ती मान्य झाली असून, जिल्ह्यात आधारभूत खरेदी योजनेत मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे मेळघाटातील मका, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचे त्या म्हणाल्या.

जिल्ह्याच्या उद्दिष्टानुसार शेतकऱ्यांच्या मक्याची खरेदी सुरू झालेली असताना उद्दिष्ट पूर्ण झाले होते. त्यासह विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर अनेक शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात आला नाही. हे लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी तातडीने केंद्रीय रेल्वे तथा उपभोक्ता कार्य, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री पीयुष गोयल, केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांना केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातील विशेषत: मेळघाटातील आदिवासी शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेऊन ना. ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला व त्याबाबत पालकमंत्र्यांची केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बैठकही झाली. या मागणीनुसार अमरावती जिल्ह्यासाठीचे उद्दिष्ट व कालावधी वाढवून देत असल्याचे केंद्रीय ना. दानवे यांनी सांगितले.

उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे खरेदीला अडचणी येत होत्या. मात्र, आता मान्यता मिळाल्याने खरेदीपासून वंचित राहिलेल्या अनेक शेतकरी बांधवांना न्याय मिळणार आहे, असे आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक सुनीता महाजन यांनी सांगितले.

बॉक्स

गोदामाची व्यवस्था, अन्य केंद्रेही होणार सुरू

मका खरेदीसाठी ६ हजार ५०० क्विंटल व ज्वारीसाठी ६ हजार ३०० क्विंटल व ३१ जानेवारीपर्यंतचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. साद्राबाडी, बैरागड, चुरणी, कौलखेडा बाजार येथील विविध केंद्रे सोमवारपासून सुरू होतील. त्याचप्रमाणे, धारणी, चाकर्दा, टिटंबा, सावलखेडा येथील केंद्रासाठीही गोदामांची व्यवस्था करण्यात येत असून, तेही एक-दोन दिवसातच सुरू होतील, असे ना. ठाकूर यांनी सांगितले.

Web Title: Basic procurement resumes corn, sorghum procurement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.