शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
6
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
7
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
8
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
9
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
10
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
11
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
12
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
13
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
14
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
17
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
18
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
19
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
20
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
Daily Top 2Weekly Top 5

बडनेर्‍याच्या पाणी टंचाईचा आमदारांनी घेतला आढावा

By admin | Updated: May 20, 2014 23:18 IST

बडनेरा येथील नवी वस्ती व जुनी वस्ती तसेच या मतदारसंघातील विविध गावांमध्ये भासत असलेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावर आ. रवी राणा यांनी मंगळवारी बडनेरा येथे

अमरावती : बडनेरा येथील नवी वस्ती व जुनी वस्ती तसेच या मतदारसंघातील विविध गावांमध्ये भासत असलेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावर आ. रवी राणा यांनी मंगळवारी बडनेरा येथे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेऊन पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

बडनेरा शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाई भासत असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. बडनेरा येथील नवीवस्ती, जुनीवस्ती येथे एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असून काही भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने पाणी टंचाईची समस्या शहरात गंभीर बनली आहे त्यामुळे ही पाणी टंचाई निवारणार्थ तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच बडनेरा येथील नवीन पाणी टाकीच्या बांधकामास शासनाकडून मंजुरात घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करावा अश्या सूचना राणा यांनी अधिकार्‍यांना दिल्या असून यासाठी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय बडनेरा मतदारसंघातील अंजनगाव बारी परिसरातील गावांमध्येही पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यामुळे विहीर अधिग्रहण, नादुरूस्त असलेले हँडपंप दुरूस्त करून तातडीने व्यवस्था करावी, बोडणा, भानखेडा, हातला, अमडापूर, इंदला, घातखेडा, कस्तुरा मोगरा, काटआमला, लोणटेक, मलकापूर, मासोद, राजूरा, पार्डी, पिंपळखुटा आदी गावातीलही पाणी टंचाईच्या समस्या निवारण्यासाठी अधिकार्‍यांनी स्वत: दौरे करून उपाययोजना कराव्यात. यावेळी आमदारांनी जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून पाणी टंचाईची माहिती जाणून घेतली. यावेळी मजिप्राचे अधिकारी प्रशांत भांबरे, सोनारे, नवताळे, जि. प. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी श्‍वेता बॅनर्जी, तहसीलदार बागडे, गटविकास अधिकारी प्रमोद कापडे, मेश्राम तसेच विविध विभागाचे खातेप्रमुख, नगरसेवक व ग्रामस्थांनी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)