शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

बडनेरा येथे सफाई कर्मचाऱ्यांचे औक्षण, पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 5:00 AM

बडनेरा येथील प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत पाचबंगला येथे हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता कर्मचारी हे अनेकांच्या नजरेत दुर्लक्षित असा वर्ग समजला जातो. मात्र, लॉकडाऊनमध्ये महापालिका कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांची कामगिरी ही अद्वितीय ठरली आहे. नाल्यांची स्वच्छता, प्रभागातील साफसफाई, डास निर्मूलन फवारणी, जंतुनाशक फवारणीच्या कामी हे स्वच्छता कर्मचारी नागरिकांच्या नजरेत अग्रणी ठरले आहे.

ठळक मुद्देपाच बंगला परिसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आगळा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका स्वच्छता कर्मचारी जिवाची तमा न बाळगता नियमितपणे स्वच्छतेची कामे करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यामुळे स्थानिक पाचबगंला परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त महिला मंडळाने स्वंयस्फूर्तीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे औक्षण आणि पूजन करून त्यांचा सन्मान केला.बडनेरा येथील प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत पाचबंगला येथे हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता कर्मचारी हे अनेकांच्या नजरेत दुर्लक्षित असा वर्ग समजला जातो. मात्र, लॉकडाऊनमध्ये महापालिका कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांची कामगिरी ही अद्वितीय ठरली आहे. नाल्यांची स्वच्छता, प्रभागातील साफसफाई, डास निर्मूलन फवारणी, जंतुनाशक फवारणीच्या कामी हे स्वच्छता कर्मचारी नागरिकांच्या नजरेत अग्रणी ठरले आहे. परिणामी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक २२ मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांना महिलांच्या पुढाकाराने गौरविण्यात आला. अनिल भालचक्र, मोहन गजभिये, मनोहर रंदळे, सोनाली भालचक्र, सुनंदा रंदळे, पूजा पाटील, रंजना धोत्रे, शोभा चोरआमले, अक्षिता भालचक्र, छाया धारगावे, ज्योती खरात, शोभा ढोके, सलोनी भालचक्र आदींनी सफाई कामगारांचे पूजन, औक्षण करून सन्मान केला. दरम्यान सफाई सुपरवायझर प्रवीण अडकणे यांच्याही सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती