श्रीसंत खप्ती महाराज संस्थानची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 18:32 IST2026-03-04T18:30:02+5:302026-03-04T18:32:39+5:30

Amravati : चांदूर रेल्वे तालुक्यातील बागापूर येथील 'श्रीसंत खप्ती महाराज संस्थान'ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Attempt to grab property of Sreesanth Khapti Maharaj Sansthan; Case registered against eight people | श्रीसंत खप्ती महाराज संस्थानची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Attempt to grab property of Sreesanth Khapti Maharaj Sansthan; Case registered against eight people

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
चांदूर रेल्वे तालुक्यातील बागापूर येथील 'श्रीसंत खप्ती महाराज संस्थान'ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फिर्यादी रूपराव निरंजन चौधरी (७३, रा. बागापूर) यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी सोमवारी एकूण ८ आरोपींविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

श्री संत खप्ती महाराज हे अविवाहित होते. त्यांनी १९५२ साली निरंजन चौधरी यांना रीतसर दत्तक घेतले होते आणि १० जानेवारी १९५३ रोजी त्यांची दत्तकपुत्र म्हणून नोंदणीही करण्यात आली होती. १० नोव्हेंबर २०२३ रोजी निरंजन चौधरी यांचे निधन झाले. त्यांच्या हयातीत त्यांनी १७ जानेवारी २०२३ रोजी एक मृत्युपत्र तयार केले होते, ज्यावर साक्षीदार म्हणून निरंजन चौधरी यांनी संमती दिली होती.

या मृत्युपत्रानुसार, त्यांच्या मालकीची काही मालमत्ता पुतण्या रूपराव चौधरी यांना देण्यात आली होती, तर उर्वरित सर्व मालमत्ता श्री संत खप्ती महाराज संस्थान, बागापूर या नावाने समाविष्ट करण्यात आली होती. सर्व आठही आरोपींनी मिळकतीबाबत वाद निर्माण केला.

बनावट कागदपत्रांचा असा झाला वापर

फिर्यादीनुसार, आरोपींनी संगनमत करून मालमत्ता हडपण्याचा कट रचला. निरंजन चौधरी यांच्या मालकीच्या सांगळवाडा येथील शेतजमिनीचे मूल्यांकन दाखले व इतर महत्त्वाची कागदपत्रे मिळवून, त्यात फेरफार करून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवले.
आरोपींनी स्वतःची खोटी ओळख निर्माण करून आणि वंशज असल्याचे सांगून संस्थानच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार फसवणुकीच्या उद्देशाने केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

यांच्याविरुद्ध एफआयआर

याप्रकरणी रूपराव निरंजन चौधरी (वय ७३ वर्ष, रा. बागापूर) यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी शरद भाऊराव चौधरी, गोवर्धन वामनराव चौधरी, अशोक वामनराव चौधरी, सुरेश वामनराव चौधरी (सर्व रा. बागापूर, ता. चांदूर रेल्वे), धर्मेंद्र गोवर्धन चौधरी, सोनाली धर्मेंद्र चौधरी, पद्माकर गोवर्धन चौधरी (सर्व रा. गिरजानगर, धामणगाव रेल्वे) व अर्चना प्रशांत गंधोळे (रा. यवतमाळ) यांच्याविरुद्ध फसवणूक व गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहित कुबडे हे करत आहेत.

Web Title : श्री संत खप्ती महाराज संस्थान की संपत्ति हड़पने का प्रयास; मामला दर्ज

Web Summary : श्री संत खप्ती महाराज संस्थान की संपत्ति को फर्जी दस्तावेजों से हड़पने की कोशिश। आठ लोगों के खिलाफ मामला दर्ज। आरोपियों ने संपत्ति पर दावा करने के लिए झूठी पहचान और दस्तावेज बनाए। पुलिस जांच जारी है।

Web Title : Attempt to Grab Shri Sant Khapti Maharaj Trust Property; FIR Filed

Web Summary : Eight individuals are booked for allegedly attempting to seize property of Shri Sant Khapti Maharaj Trust using forged documents. The accused created false identities and documents to claim the property. Police investigation is underway following a complaint.