शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

शंकरबाबांच्या भेटीसाठी अर्चना कासाविस

By admin | Updated: July 29, 2014 23:34 IST

शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या अर्चनाला पाच पिशव्या रक्त चढविण्यात आल्यावर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तिला मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. १ मधून डिस्चार्ज

प्रकृतीत सुधारणा : जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्जअमरावती : शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या अर्चनाला पाच पिशव्या रक्त चढविण्यात आल्यावर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तिला मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. १ मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी शंकरबाबाजवळ जाण्याची तिची तळमळ पाहायला मिळाली.२१ जुलै रोजी अर्चनाला जिल्हा सामान्य रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. तिच्या शरीरातील रक्त कमी झाल्याने तिला रक्ताची आवश्यकता होती. त्यामुळे ‘लोकमत’ने रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यावेळी रक्तदात्यांची रीघ लागली होती. तिला ओ पॉझिटीव्हच्या पाच पिशव्या रक्त चढविण्यात आले. मागील आठ दिवसांपासून अर्चना रुग्णालयात उपचार घेत असताना तिला आपल्या घरची आठवण येत होती. वझ्झर येथील बालगृहात दररोज मुलं-मुली खेळतांना, बागळताना अर्चनाच्या दृष्टीस पडत होते. मात्र गेल्या आठ दिवसांत आपल्या जवळ कोणी नसल्याने तिच्या भावना अनावर झाल्याचे रुग्णालयातून सुट्टीच्या दिवशी दिसत होते. मंगळवारी रुग्णालयात तिला आठ दिवस पूर्ण झाल्याने तिला घरी जाण्याचे वेध लागले होते. २७ जुलैला तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी अर्चनाच्या मनात घरी जाण्याची तळमळ दिसून येत होती. ‘मुझे मेरे शंकरबाबा के पास जाना है’, अशी विनवणी वॉर्डन वर्षा काळे यांच्याकडे केली होती. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला आता सुट्टी देण्यात आली आहे.मंगळवारी दुपारी १ वाजता अर्चनाला रुग्णवाहीकेद्वारे वझ्झर नेण्यात आले.