शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

प्राण्यांना रंग लावल्यास होऊ शकते शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 14:20 IST

प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षेची तरतूद असून, हिडीस प्रदर्शन न करता नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळा, असे आवाहन वसा या अमरावतीमधील संस्थेकडून करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवसा संस्थेची जनजागृतीनैसर्गिक रंगांनी खेळा रंगपंचमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आनंद व उत्साहाचे प्रतीक असलेला होळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहान मंडळी तर आठवड्याभरापासून खरेदी आणि इतर तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर वसा या अमरावतीमधील संस्थेने सोशल मीडियावर जनजागृतीपर मार्गदर्शन केले आहे. प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षेची तरतूद असून, हिडीस प्रदर्शन न करता नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.समाजात अनेक जण सणाच्या अतिउत्साहात रस्त्यावरील बेवारस श्वान, मांजरी, गाय, बैल, गाढव आणि वन्यजिवामध्ये विशेषत: माकडांना गंमत म्हणून रंग लावतात. या रंगामुळे प्राण्यांना अंधत्व येऊ शकते. त्यांना त्वचेचे दुधर आजार होऊ शकतात. त्यामुळे प्राण्यांसोबत होळी न खेळण्याचे आवाहन ठकसेन ऊर्फ तुषार इंगोले व शुभम सांयके यांनी केले आहे.रस्त्यावरील बेवारस प्राण्यांना रंग लावल्यास, त्यांच्या अंगावर होळीतील गरम पाणी टाकल्यास किंवा त्यांना इतर कोणताही त्रास दिल्यास, हा प्रकार प्राणी क्रूरता कायदा १९६० आणि हाच प्रकार वन्यजिवाबाबत झाल्यास वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ सुधारणा कायदा २००२ नुसार शिक्षेस पात्र आहे, अशी माहिती वसाचे अ‍ॅनिमल रेस्क्यूअर अभिजित दाणी यांनी दिली.आपल्या थोड्याशा मौजेसाठी रासायनिक रंगाने होळी खेळून आपल्या आरोग्यासोबत खेळ करणे ही योग्य बाब नाही. लहानग्यांना या रासायनिक रंगाबद्दल माहिती नाही. तेव्हा घरातील मोठ्या आणि जबाबदार व्यक्तींनी लहानग्यांना नैसर्गिक रंग खेळायला द्यायला हवे.- रोहित रेवाळकर, निसर्गप्रेमीरासायनिक रंगांचे अनेक दुष्पपरिणामरासायनिक रंगांचे अनेक दुष्पपरिणाम आहेत. लाल रंगात मर्क्युरी सल्फाइटचा वापर होतो. यामुळे लकवा, मेंदूची वाढ खुंटणे, कर्करोग असे आजार जडतात. काळ्या रंगासाठी लेड आॅक्साइड वापरले जाते. यामुळे त्वचेला खाज, मूत्रपिंडाचे विकार बळावतात. हिरव्या रंगात कॉपर सल्फेट मोठ्या प्रमाणात असते. डोळ्यांची खाज व त्यातून पाणी येण्याचे प्रकार यातून घडतात. निळा रंग पार्शियन ब्लू या रसायनाच्या वापरातून बनविले जाते. त्यामुळे त्वचेचे विकार होतात. चांदी रंग अल्युमिनियम ब्रोमाइडने बनविला जातो. त्वचेचा कर्करोग होण्याची भीती यामुळे असल्याचे संस्थेचे मुकेश वाघमारे यांनी सांगितले.कसा तयार करता येतो नैसर्गिक रंग?रंग काय वापराल? प्रक्रियाजांभळा बीट फळाची साल आणि गर पाण्यात विरघळवून रंग तयार होतोपिवळा हळकुंड आणि झेंडूची फुले पाण्यात उकळून रंग तयार होतोकाळा आवळ्याच्या किस लोखंडी भांड्यात उकळून काळा रंग तयार होतोलाल पळसाचे फुलं, गुलाबाच्या पाकळ्या कुस्करून आकर्षक लाल रंग होतोहिरवा झाडांची हिरवी पाने लगदा तयार करून पाण्यात टाकावा

टॅग्स :Holiहोळी