शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव पालिकेत ४५ लाखांचा मालमत्ता मूल्यमापन घोटाळा ?

By admin | Updated: November 17, 2014 22:44 IST

पालिकेच्या मालमत्तांचे कर मूल्यमापन करताना अमरावती येथील स्थापत्य कन्सलटन्सी नामक एका कागदोपत्री संस्थेने पालिकेच्या तत्कालीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संगनमत करून

कारवाईची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारअंजनगाव सुर्जी : पालिकेच्या मालमत्तांचे कर मूल्यमापन करताना अमरावती येथील स्थापत्य कन्सलटन्सी नामक एका कागदोपत्री संस्थेने पालिकेच्या तत्कालीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संगनमत करून ४५ लाख रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप नगरसेवक नीलेश पसारी यांनी केला आहे. याबाबतची लेखी तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून १८ नोव्हेंबर रोजी पंसारी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी पाचारण केले आहे. अंजनगाव पालिकेच्या कार्यक्षेत्रात मालमत्तेसंबंधी जमिनी व इमारतींचे कर मूल्यनिर्धारण, स्थळ सर्वेक्षणे, मालमत्तांचे संगणीकृत नकाशे, डिजिटल कलर फोटो काढून संगणक प्रणालीला जोडणे इत्यादींबाबत निविदा काढून योग्य त्या कंपनीस कंत्राट द्यावयाचे होते. परंतु तत्कालीन नगराध्यक्ष आदेश बोबडे व पदाधिकाऱ्यांनी निविदा प्रचलित वृत्तपत्रांना न देता एका कमी खपाच्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केली. त्यांनी संगनमत करून एकाच ठिकाणच्या तीन बोगस आणि एकमेकांसोबत संलग्न असणाऱ्या तीन आस्थापनांकडून निविदा घेतल्या. त्यातीलच स्थापत्य कन्सलटन्सी नामक एका संस्थेसोबत करारनामा करून कर मूल्यनिर्धारणाचे कंत्राट प्रति मालमत्ता ३६७ रूपयेप्रमाणे दिल्याचा आरोप नगरसेवक नीलेश पंसारी यांनी केला आहे.