शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावला वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: June 26, 2016 00:02 IST

शहरात शुक्रवारी रात्री ९ ते ९.३० वाजतादरम्यान अचानक वादळासह विजेचा कडकडाट झाला. पावसामुळे या भागातील घरे, शाळा, दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

शेकडो घरांची पडझड, झाडे उन्मळली : अकोट-परतवाडा मार्गावरील वाहतूक ठप्पअंजनगाव सुर्जी : शहरात शुक्रवारी रात्री ९ ते ९.३० वाजतादरम्यान अचानक वादळासह विजेचा कडकडाट झाला. पावसामुळे या भागातील घरे, शाळा, दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चक्रीवादळाने शहरातील प्रत्येक नागरिक जीव मुठीत धरून घरात बसून होता.अंजनगाव-अकोट मार्ग जाम झाल्यामुळे वाहनचालकांतसुध्दा चकमक उडाली. शहरातील गुलजारपुरा, यशनगर, दयानंद नगर, अंबानगर, शिवपार्वती नगर, हेंड प्लॉट, या भागातील झाडे घरावर कोसळले असून घरावरील छत, टिनपत्रे उडून २२गेली, त्यामुळे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले. यशनगर शेजारील पंचफुलाबाई हरणे महाविद्यालयाचे व शाळेचे टिनाचे छत उडून गेले. त्यामुळे ऐन शाळेला सुरुवात होण्याच्या काहीच दिवसांपूर्वी हा भयंकर प्रसंग उद्भवल्यामुळे शाळा, महाविद्यालय व्यवस्थापनाची धांदल उडाली आहे. गुलजारपुरा येथील कराळे, रेखासुने, शहाबुद्दीन, नरेंद्र हेड, भगवान थोरात यांच्या घराचे फारमोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदरच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आ.रमेश बुंदिले शहराध्यक्ष मनोहर मुरकुटे, नायब तहसीलदार चव्हाण यांनी करून नुकसानग्रस्तांना मदतीच्या सूचना आ.रमेश बुंदिले यांनी दिल्यात. (शहर प्रतिनिधी)शेतकऱ्यांचे लाखोंचे पीक जमीनदोस्तअंजनगाव सुर्जी तालुका आधीच दरवर्षीच्या निसर्गाच्या अवकृपेने होरपळून निघत आले. सतत तीन वर्षांपासून शेतकरी संकटात सापडला आहे. दरवर्शी अस्मानी, सुल्तानी संकटाला या भागातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. असेच संकट शुक्रवारी रात्री अचानक ९ वाजतादरम्यान आल्याने वादळ व विजेच्या कडकडाटामुळे, खोडगाव, शेलगाव, तुरखेड, निमखेड, पांढरी या भागातील संत्रा, केळी, पानपिंपरी आदी पिके जमीनदोस्त झाली. या भागातील लाखो रुपये किमतीचे पीक हे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी हा पूर्णपणे धास्तावून गेला आहे.