अन् तब्बल साडेचार वर्षांनंतर त्या बालकाने ऐकला पहिल्यांदा आवाज

By उज्वल भालेकर | Updated: October 18, 2025 18:55 IST2025-10-18T18:48:58+5:302025-10-18T18:55:07+5:30

Amravati : पालकांचा आनंद गगनात मावेना, सुपरमध्ये झाली होती कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया

And after four and a half years, the child heard a voice for the first time. | अन् तब्बल साडेचार वर्षांनंतर त्या बालकाने ऐकला पहिल्यांदा आवाज

And after four and a half years, the child heard a voice for the first time.

अमरावती : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या त्या साडेचार वर्षीय बाळाने तब्बल साडेचार वर्षांनी पहिल्यांदा आवाज ऐकला. शनिवारी रुग्णालयात या बाळाला बाह्य यंत्रणा (स्पीच प्रोसेसर) जोडण्यात आले. त्यामुळे या बाळाने आवाज ऐकला आणि या भावनिक क्षणी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. यावेळी प्रामुख्याने आमदार खोडके दाम्पत्य उपस्थित होते. तसेच ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. जीवन वेदी, सुपरचे ओएसडी डॉ. मंगेश मेंढे, ऑडिओलॉजिस्ट लक्ष्मण मोरे उपस्थित होते.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे जन्मजात मूकबधिर असलेल्या साडेचार वर्षीय मुलावर २६ सप्टेंबर रोजी क्वॉक्लियर इम्प्लांट ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे, ही शस्त्रक्रिया रुग्णालयातीलच नव्हे, तर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातीलदेखील पहिलीच शस्त्रक्रिया होती. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन समितीतून या शस्त्रक्रियेसाठी निधी उपलब्ध करण्यात आला होता. याकरिता रुग्णालयातील औषध विभाग प्रमुख योगेश वाडेकर यांनी देखील तातडीने आवश्यक कॉक्लियर इम्पलांट शस्त्रक्रियेत बसिवण्यात येणारे इलेक्ट्राॅनिक यंत्र मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ही शस्त्रक्रिया नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजचे ईएनटी विभाग प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी यशस्वी केली होती. या शस्त्रक्रियेनंतर जखम बरी होण्यासाठी तीन आठवडे बाळाला विश्रांती देण्यात आली. आणि जखम बसल्यावर शनिवारी या बाळाला डिव्हाइसचे ऍक्टिव्हेशन म्हणजेच स्पीच प्रोसेसर बसविण्यात आल्याने बाळाने पहिल्यांदा आवाज ऐकला. त्यामुळे या बाळांच्या पालकांना झालेला आनंद हा गगनात मावेनासा होता. यावेळी पालकांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानत त्यांचा सन्मान केला.

दोन वर्षे सुरू राहणार स्पीच थेरेपी

साडेचार वर्ष बाळाने कोणताही आवाज ऐकलेला नसल्याने तो बाळ बोललेला नाही. त्याला शब्दांची ओळख तसेच उच्चारही करता येत नाही. त्यामुळे आता स्पीच प्रोसेस बसविल्याने या बाळाला ऐकायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाळाला नव्याने ऐकू येणारे आवाज समजून घेण्यासाठी आणि त्यावर प्रतिसाद देण्यासाठी स्पीच थेरपी व श्रवण पुनर्वसन आवश्यक असते. ही थेरेपी ऑडिओलॉजिस्ट लक्ष्मण मोरे हे देणार आहेत. तब्बल दीड ते दोन वर्षे या बाळाला बोलण्यासाठी वेळ लागेल.

Web Title : साढ़े चार साल बाद, बच्चे ने पहली आवाज़ सुनी

Web Summary : अमरावती में साढ़े चार साल के बच्चे ने कॉक्लियर इंप्लांट सर्जरी के बाद पहली बार आवाज़ सुनी। स्पीच प्रोसेसर चालू किया गया, जिससे सभी खुश हुए। बच्चे के बोलने के विकास में मदद के लिए दो साल तक स्पीच थेरेपी जारी रहेगी।

Web Title : After Four and a Half Years, Child Hears First Sound

Web Summary : A four-and-a-half-year-old child in Amravati heard sound for the first time after a successful cochlear implant surgery. The speech processor was activated, bringing joy to everyone. Speech therapy will continue for two years to aid the child's speech development.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.