अमरावतीची कोमल ठरली अमेरिकेत सौंदर्यवती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 20:04 IST2018-10-29T20:04:17+5:302018-10-29T20:04:48+5:30
अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील कोमल प्रकाश गुडघे हिने अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या एका सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेऊन मोस्ट ब्युटीफूल हेअर या प्रकारात सौंदर्यवतीचा बहुमान पटकावला.

अमरावतीची कोमल ठरली अमेरिकेत सौंदर्यवती
अमरावती - जिल्ह्यातील खारतळेगाव येथील कोमल प्रकाश गुडघे हिने अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या एका सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेऊन मोस्ट ब्युटीफूल हेअर या प्रकारात सौंदर्यवतीचा बहुमान पटकावला. 'मिसेस भारत ओहिओ २०१८' ही स्पर्धा अमेरिकेतील कोलंबस या शहरात नुकतीच पार पडली. कोमल औरंगाबाद येथून विधी पदवीधर आहे. लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. तिने अमरावती जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार केल्याबद्दल सर्वांकडून तिचे कौतुक होत आहे.