शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या संशोधकांना मिळाले दक्षिण आफ्रिकेचे 'पेटंट'; आरोग्य क्षेत्रात अचूक उपचारांसाठी मिळाला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:13 IST

Amravati : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठाच्या जीवतंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या संशोधकांनी विकसित केलेल्या एका नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला दक्षिण आफ्रिका सरकारचे 'पेटंट' बहाल करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठाच्या जीवतंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या संशोधकांनी विकसित केलेल्या एका नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला दक्षिण आफ्रिका सरकारचे 'पेटंट' बहाल करण्यात आले आहे. अमरावती विद्यापीठाच्या या चमीचे हे तिसरे पेटंट असून आरोग्य उपचारासाठी मौलिक ठरणारे आहे.

प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. नीरज घनवटे आणि संशोधक विद्यार्थिनी पूजा मांडविय यांनी जीवाणूंविरुद्ध 'निवडक प्रतिजैविकांच्या किमान प्रतिबंधात्मक एकाग्रतेचा शोध घेण्यासाठी एक किट' या विषयावर हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. जीवाणूंविरुद्ध विशिष्ट प्रतिजैविकांची परिणामकारकता तपासण्यासाठी लागणारा वेळ या किटमुळे कमी होणार आहे.आरोग्य क्षेत्रात अचूक उपचारांसाठी हे संशोधन अत्यंत मोलाचे ठरणार आहे. या आंतरराष्ट्रीय यशामुळे विद्यापीठाच्या संशोधन कार्याची दखल आता जागतिक स्तरावर घेतली आहे.

अतुलनीय योगदान

डॉ. प्रशांत ठाकरे आणि डॉ. नीरज घनवटे यांचे हे तिसरे पेटंट आहे, जे त्यांच्या सातत्यपूर्ण संशोधनाची साक्ष देते. या संशोधक जोडीने अमरावती जिल्ह्यात 'मॉलिक्युलर डायग्नोसिस लॅब' स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.याद्वारे पाच लाखांहून अधिक कोविड चाचण्या करून त्यांनी आरोग्य व्यवस्थेला मोठे योगदान दिले आहे. कोरोनाकाळातील सेवा महत्वपूर्ण ठरली आहे. हैदराबाद येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत सुद्धा त्यांच्या या संशोधनाचे कौतुक होऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati Researchers Secure South African Patent for Healthcare Innovations

Web Summary : Amravati University researchers secured a South African patent for their innovative kit, speeding up antibiotic effectiveness testing. This advancement promises more precise healthcare treatments, marking a significant global recognition for the university's research contributions in molecular diagnostics.
टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठEducationशिक्षण