अमरावतीच्या संशोधकांना मिळाले दक्षिण आफ्रिकेचे 'पेटंट'; आरोग्य क्षेत्रात अचूक उपचारांसाठी मिळाला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:13 IST2026-01-23T13:10:54+5:302026-01-23T13:13:17+5:30

Amravati : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठाच्या जीवतंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या संशोधकांनी विकसित केलेल्या एका नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला दक्षिण आफ्रिका सरकारचे 'पेटंट' बहाल करण्यात आले आहे.

Amravati researchers get South African 'patent'; Honored for precision treatments in the health sector | अमरावतीच्या संशोधकांना मिळाले दक्षिण आफ्रिकेचे 'पेटंट'; आरोग्य क्षेत्रात अचूक उपचारांसाठी मिळाला मान

Amravati researchers get South African patent for precision medicine in healthcare sector

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठाच्या जीवतंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या संशोधकांनी विकसित केलेल्या एका नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला दक्षिण आफ्रिका सरकारचे 'पेटंट' बहाल करण्यात आले आहे. अमरावती विद्यापीठाच्या या चमीचे हे तिसरे पेटंट असून आरोग्य उपचारासाठी मौलिक ठरणारे आहे.

प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. नीरज घनवटे आणि संशोधक विद्यार्थिनी पूजा मांडविय यांनी जीवाणूंविरुद्ध 'निवडक प्रतिजैविकांच्या किमान प्रतिबंधात्मक एकाग्रतेचा शोध घेण्यासाठी एक किट' या विषयावर हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. जीवाणूंविरुद्ध विशिष्ट प्रतिजैविकांची परिणामकारकता तपासण्यासाठी लागणारा वेळ या किटमुळे कमी होणार आहे.आरोग्य क्षेत्रात अचूक उपचारांसाठी हे संशोधन अत्यंत मोलाचे ठरणार आहे. या आंतरराष्ट्रीय यशामुळे विद्यापीठाच्या संशोधन कार्याची दखल आता जागतिक स्तरावर घेतली आहे.

अतुलनीय योगदान

डॉ. प्रशांत ठाकरे आणि डॉ. नीरज घनवटे यांचे हे तिसरे पेटंट आहे, जे त्यांच्या सातत्यपूर्ण संशोधनाची साक्ष देते. या संशोधक जोडीने अमरावती जिल्ह्यात 'मॉलिक्युलर डायग्नोसिस लॅब' स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
याद्वारे पाच लाखांहून अधिक कोविड चाचण्या करून त्यांनी आरोग्य व्यवस्थेला मोठे योगदान दिले आहे. कोरोनाकाळातील सेवा महत्वपूर्ण ठरली आहे. हैदराबाद येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत सुद्धा त्यांच्या या संशोधनाचे कौतुक होऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title : अमरावती के शोधकर्ताओं को स्वास्थ्य नवाचार के लिए दक्षिण अफ्रीकी पेटेंट मिला

Web Summary : अमरावती विश्वविद्यालय के शोधकर्ताओं ने एक नवीन किट के लिए दक्षिण अफ्रीकी पेटेंट प्राप्त किया, जो एंटीबायोटिक प्रभावशीलता परीक्षण को गति देता है। यह उन्नति सटीक स्वास्थ्य उपचार का वादा करती है, जो आणविक निदान में विश्वविद्यालय के अनुसंधान योगदान के लिए एक महत्वपूर्ण वैश्विक मान्यता है।

Web Title : Amravati Researchers Secure South African Patent for Healthcare Innovations

Web Summary : Amravati University researchers secured a South African patent for their innovative kit, speeding up antibiotic effectiveness testing. This advancement promises more precise healthcare treatments, marking a significant global recognition for the university's research contributions in molecular diagnostics.