धावत्या दुचाकीवरील महिलेचे १८ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले

By प्रदीप भाकरे | Updated: June 24, 2024 17:24 IST2024-06-24T17:24:34+5:302024-06-24T17:24:51+5:30

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; जुना बायपास मार्गावरील घटना

Amravati Mangalsutra weighing 18 grams was seized from a woman on a running bike | धावत्या दुचाकीवरील महिलेचे १८ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले

(प्रातिनिधीक छायाचित्र)

अमरावती : मुलीसोबत दुचाकीने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दोन दुचाकीस्वारांनी पळ काढला. २४ जून रोजी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील जुना बायपास मार्गावर ही घटना घडली. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी अज्ञात दोन लुटारूंविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक वारकरीनगर येथील रहिवासी करुणा राजेंद्र कडू (४५) या आपल्या मुलीसह दुचाकीने जुना बायपास मार्गावरील एका मंगल कार्यालयात आयोजित नातेवाइकाच्या लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी जात होत्या. मार्गात दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी अचानक त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकाविले. त्यानंतर त्यांनी बडनेराच्या दिशेने पळ काढला. घटनेनंतर करुणा कडू यांनी राजापेठ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी कडू यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Amravati Mangalsutra weighing 18 grams was seized from a woman on a running bike